शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३७ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:24 IST

गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.

ठळक मुद्देजलप्रकल्पात २२ टक्के साठा : अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षी जिल्हावासीयांना दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्केच पाऊस कोसळला. परिणामी जलप्रकल्प निम्मेही भरले नाही.यावर्षी मे महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाची चाहूल लागताच जिल्हावासीयांना यावर्षी चांगला पाऊस कोसळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. प्रत्यक्षात रोहिणी आणि मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने हजेरी लावलीच नाही. जून महिन्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकरी संकटात सापडले. जलप्रकल्पही जेमतेम २२ टक्केच भरले. आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३७ टक्के पाऊस झाल्याने पुन्हा सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे.कमी पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प निम्मेही भरले नाहीत. सध्या मोठ्या पूस प्रकल्पात १६.९७ टक्केच पाणीसाठा आहे. अरूणावती प्रकल्पात २१.५८, बेंबळा २६.८१, अडाण २९.०६, नवरगाव २३.१६, गोकी १०.५८, वाघाडी १७.२२, सायखेडा ३५.१४, अधरपूस ४५.७३, तर बोरगाव प्रकल्पत केवळ १.३६ टक्के जलसाठा आहे.गतवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये ३० टक्के जलसाठा होता. यावर्षी तो २२ टक्केवरच आला. यामुळे जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील नक्षात चांगला पाऊस झाल्यास जलप्रकल्प भरतील. अन्यथा जिल्हा पुन्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.वणी, झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानजिल्ह्यातील जलप्रकल्पाची पावसाची प्रतीक्षा असताना गेल्या २४ तासांत वणी आणि झरी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली. या दोन्ही तालुक्यात सोमवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा, विदर्भा आदी नदींसह सर्वच नाले दुथडी भरून वाहात आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसelectricityवीज