शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
4
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
5
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
6
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
7
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
8
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
9
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
10
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
11
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
13
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
14
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
15
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
16
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
17
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
19
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

यवतमाळच्या बीडीओंना आयुक्तांचा दणका

By admin | Updated: March 12, 2017 00:54 IST

जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन सक्षम करण्यासाठी पंचायत समितीच्या परिसरात बहुअपंग प्रवर्ग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले.

बहुअपंग प्रशिक्षण केंद्र : खुलासा मागितला यवतमाळ : जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन सक्षम करण्यासाठी पंचायत समितीच्या परिसरात बहुअपंग प्रवर्ग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. मात्र पंचायत समितीने विविध योजनांचे साहित्य ठेवण्यासाठी या केंद्राचा गोदामासारखा वापर सुरू केला. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच विभागीय आयुक्तांनी बीडीओंकडून खुलासा मागविला आहे. ‘जिल्ह्यातील साडेआठ हजार अपंगांच्या शिक्षणात बीडीओंची बाधा’ असे वृत्त १६ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची विभागीय आयुक्तांनी तातडीने दखल घेत या केंद्रातील साहित्य बाहेर काढण्याचे आदेश दिले. शिवाय, १७ लाख रुपये खर्चून अपंगांसाठी उभारण्यात आलेले हे केंद्र साहित्य ठेवण्यासाठी कसे काय वापरले, याबाबत बीडीओंकडून खुलासाही मागितला आहे. अपंग विद्यार्थ्यांना स्पिच थेरेपी, फिजिओ थेरेपी, मानसिक मूल्यमापन करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी यवतमाळ पंचायत समितीच्या परिसरात प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच ही इमारत समावेशित शिक्षण कक्षाकडे न सोपविता पंचायत समितीने आपल्या विविध योजनांचे साहित्य तेथे भरून ठेवले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी वारंवार सूचना करूनही ही इमारत खाली करून देण्यात आली नाही. अखेर ‘लोकमत’ने १६ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करताच थेट विभागीय आयुक्तांनी सीईओंना याबाबत जाब विचारला. बीडीओंकडून खुलासा घेण्याचेही आदेश त्यांनी दिले. चावी नेमकी कुणाकडे? दरम्यान, ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच यवतमाळ पंचायत समितीने अपंगांच्या प्रशिक्षण केंद्रात ठेवलेले आपले साहित्य तातडीने बाहेर काढून घेतले. मात्र, अद्यापही हे केंद्र रीतसर समावेशित शिक्षण कक्षाकडे सोपविण्यात आलेले नाही. या इमारतीची चावी समावेशित शिक्षण कक्षाकडे देण्यात आली नाही. पंचायत समितीतील नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्याकडे ही चावी देण्यात आली, याचे उत्तर कुणीही द्यायला तयार नाही.