शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचा दौरा, अध्यक्ष अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:51 IST

जिल्हा परिषदेत सध्या ‘गुड खिचडी’ सरकार असल्याने वितंडवाद वाढला असून प्रशासन मुजोर झाले आहे.

जिल्हा परिषद : माहितीच दिली नाही, प्रशासनाची अशीही मुजोरी रवींद्र चांदेकर । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषदेत सध्या ‘गुड खिचडी’ सरकार असल्याने वितंडवाद वाढला असून प्रशासन मुजोर झाले आहे. जिल्हा परिषदेत नेमके काय घडत आहे, याबाबत खुद्द अध्यक्षच अंधारात असल्याचे वास्तव पुढे येत आहे. विभागीय आयुक्त पियूष सिंग मंगळवारी प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक आटोपून जिल्हा परिषदेकडे धाव घेतली. जिल्हा परिषदेत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेत प्रथमच विभागीय आयुक्त आले असताना याबाबत अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांना साधी कल्पनाही नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आयुक्त तब्बल दोन ते तीन तास जिल्हा परिषदेत असताना अध्यक्षांना त्याची साधी कल्पनाही असू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्रमुखालाच वास्तूत कोण आले आणि कोण गेले, याची कल्पना नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय मिळणार कसा, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. प्रशासनाने अध्यक्षांना आयुक्त येत असल्याची साधी कल्पनाही दिली नाही. यावरून प्रशासन प्रचंड मुजोर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे प्रमुख हे अध्यक्ष असताना प्रशासन त्यांनाच अंधारात ठेवून आपला कार्यभाग साधत असल्याचे यावरून स्पष्ट झाले. वास्तविक प्रमुख या नात्याने प्रशासनाने त्यांना माहिती देणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या लेखी पदाधिकारी बिनकामी असल्याचे यातून दिसून येते. शासनाने अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला. लोकप्रतिनिधी म्हणून जनता त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येते. मात्र शासनाने प्रशासकीय अधिकार काढून घेतल्याने प्रशासनाच्या लेखी पदाधिकारी बिनकामी झाले आहे. ही झूल काय कामाची ? जिल्हा परिषदेत खुद्द अध्यक्षांनाच अंधारात ठेवून कारभार चालविला जात असेल, तर अध्यक्षपदाची ही झूल काय कामाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अध्यक्षांनाच अंधारात ठेवले जात असेल, तर सदस्यांना विचारणार तरी कोण, असाही प्रश्न आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या लेखी क्षुल्लक ठरत असतील, तर सामान्यांच्या समस्या सोडविणार कोण, असाही प्रश्न आहे. तथापि ‘गुड खिचडी’ सरकारमुळेच यावेळी असे प्रसंग उद्भवत असल्याचे बोलले जाते. पदाधिकारी आणि प्रशासनात समन्वय नसल्याचा हा परिपाक असल्याचे दिसून येते. यात नेमके वरचढ कोण, हा वादाचा मुद्दा असल्याने वितंडवाद वाढतच आहे. आज पालकमंत्र्यांची बैठक गाजणार जिल्हा परिषदेमध्ये गुरुवार २० जुलै रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होत आहेत. या बैठकीत आयुक्तांच्या दौऱ्यापासून खुद्द अध्यक्षांनाच अनभिज्ञ ठेवण्याचा प्रशासनाचा कारभार गाजण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी-सदस्य विरुद्ध प्रशासन असा वाद सुरू आहे. अध्यक्षांना अंधारात ठेवण्याच्या बुधवारच्या प्रकारामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विभागीय आयुक्त येणार असल्याची प्रशासनाने साधी कल्पना दिली नाही. उद्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक होत आहे. त्यात प्रशासनाला याबाबत जाब मागणार आहे. - माधुरी आडे अध्यक्ष, जि.प. यवतमाळ.