रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसने आर्थिक उलाढालीवरही परिणाम होऊ लागला आहे. रंगपंचमीच्या उत्सवावरही फरक पडला आहे. भारतीय वापाऱ्यांनी माल खरेदीसाठी केलेले कोट्यवधीचे बुकींग अडचणीत सापडले आहे. तर दुसरीकडे ग्राहकही चिनमधून आलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी नकार देत आहेत.कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाºया, विविध प्रकारचे मास्क अशा वस्तू चिनमधून आयात होत होत्या. खास करून मास्क चिनमध्ये तयार केले जातात. या मास्कला देशभरात रंगपंचमी उत्सवात अधिक मागणी असते. आता कोरोनामुळे मास्क खरेदी करण्यासाठी ग्राहक आखडता हात घेत आहे.चिनमधून येणाºया विविधरंगी पिचकाºया, गॉगल्स, टोप्या आणि विविध रंगाचे केसांचे मुखवटे बाजारात येतात. यंदाही भारतीय व्यापाऱ्यांनी चिनकडे या वस्तूंच्या मागणीसाठी बुकींग नोंदविले होते. जानेवारीमध्येच अॅडव्हान्स देण्यात आला. जानेवारीत १० टक्के माल आला. नंतर कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. तेव्हापासून साहित्य येणेच थांबले आहे. यामुळे होळीच्या तोंडावर व्यापारी अडचणीत आले आहेत. दुसरीकडे, ग्राहकही अमूक माल चायनाचा आहे काय, असा विचारतो. तो चायनाचा नसेल तरच खरेदी करतो.या परिस्थितीने दुकानदार अडचणीत आले आहे. यावर्षी बाजारावर कोरोनाचा परिणाम झाला आहे. बुकींगनंतरही माल आला नाही. यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. भारतीय वस्तूंची मागणी वाढली असल्याचे यवतमाळ येथील सिया कलेक्शनच्या संचालकांनी सांगितले.गुलाल, रंगाची मोठी आयातपक्के केमिकल रंग चिन पुरविते. अशा रंगाला मागणी आहे. मात्र असे रंग बाजारात कमी प्रमाणात मागितले जात आहेत. त्याची जागा गुलाल रंगाने घेतली आहे. मोठ्या प्रमाणात गुलालाची मागणी बाजारात वाढली.भारतीय मालाचा उठावकोरोनाच्या दहशतीने चिनी माल आला नाही. बाजारातही अशा मालाला उठाव नाही. अशा स्थितीत भारतीय रंग पिचकाºया, रंगपंचमीचे साहित्य मोठ्या प्रमाणात मागितले जात आहे.जिल्हाभरात परिणामरंगपंचमी आठवड्यावर आली आहे. ग्राहकांनी होलसेल दुकानदारांकडे गर्दी केली आहे. काही विक्रेते चिनी मालाची मागणी करीत आहेत. तर काहींनी भारतीय वस्तूंचीच मागणी करण्यास सुरूवात केली. एकूणच बाजाराचा अंदाज न आल्याने भारतीय वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
कोरोना व्हायरसने रंगपंचमी केली बेरंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाºया, विविध प्रकारचे मास्क अशा वस्तू चिनमधून आयात होत होत्या. खास करून मास्क चिनमध्ये तयार केले जातात.
कोरोना व्हायरसने रंगपंचमी केली बेरंग
ठळक मुद्देचीनमधून नवा माल आलाच नाही : चायना माल उचलण्यास स्थानिक ग्राहकांचा नकार, व्यापारी अडचणीत