लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मकरसंक्रांतीपासून थंडीचे प्रमाण कमी होतो. मात्र यावर्षी ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. निसर्गाच्या असमतोलाने तापमानाचा पारा घसरला. जिल्ह्याचे तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीक्षेत्राला याचा मोठा फ टका बसला आहे.सोमवारी गारठा वाढल्याने किमान तापमान १०.४ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले.घटत्या तापमानाने जिल्ह्यात चार दिवसांपासून शेकोट्या पेटल्या आहेत. काही शेतपिकांना याचा फायदा झाला. तर काही पिकांचे नुकसान झाले. उन्हाळी पिकांची लागवडही गारठ्यामुळे पुढे ढकलली गेली आहे. थंडी वाढल्याने गव्हावर तांबेरा येण्याचा धोका आहे. केळी आणि भाजीपाला पिकांचे उत्पादनही घटण्याचा धोका आहे. ढगाळी वातावरणाने आंब्याचा बारही घसरला आहे. यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन घटणार आहे.उन्हाळी भुईमूग लागवडीकरिता १५ अंशांच्या वर तापमानाची आवश्यकता असते. मात्र तापमानात चढउतार आहे. यामुळे भूईमूग लागवड प्रभावीत झाली आहे.
जिल्ह्यात थंडीचा पुन्हा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:26 IST
मकरसंक्रांतीपासून थंडीचे प्रमाण कमी होतो. मात्र यावर्षी ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. निसर्गाच्या असमतोलाने तापमानाचा पारा घसरला. जिल्ह्याचे तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीक्षेत्राला याचा मोठा फ टका बसला आहे.
जिल्ह्यात थंडीचा पुन्हा कहर
ठळक मुद्देतापमान १० अंशाखाली : सलग चार दिवसांपासून हुडहुडी