शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला थंड प्रतिसाद

By admin | Updated: March 27, 2016 02:25 IST

यवतमाळ जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला पहिल्या पंधरवड्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे.

१५ दिवसांत केवळ ८३७ अर्ज : बहुतांश शेतकरी योजनेपासून अनभिज्ञराळेगाव : यवतमाळ जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला पहिल्या पंधरवड्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत केवळ ८३७ अर्ज दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांचे अर्ज १४ एप्रिलपर्यंत स्वीकारले जाणार असले तरी आजचा प्रतिसाद पाहता पुढेही अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, याविषयी साशंकता आहे. शेततळ्यासाठी प्रतिसाद न मिळण्यास विविध कारणे सांगितली जात आहे. प्रगत जिल्ह्यात सदर योजनेंतर्गत उद्दिष्टाच्या तब्बल पाचपट प्रतिसाद पहिल्या पंधरवड्यात मिळाला. सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळाने सतत होरपळणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात केविलवाणा प्रतिसाद आहे. इतका अल्प प्रतिसाद का राहिला याची कारणे शोधून उर्वरित दिवसात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे यासाठी शासकीयस्तरावर जोरदार प्रयत्नाची गरज व्यक्त केली जात आहे.भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे, सधन जिल्हे असलेल्या आणि इंटरनेटचा वापर सर्वाधिक असलेल्या नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टापैकी अनुक्रमे १२ हजार २३२ आणि दहा हजार ३२९ शेतकऱ्यांचे अर्ज १५ दिवसात दाखल झाले आहेत. ते उद्दिष्टाच्या तुलनेत आजच पाचपट अधिक झाले आहे. नाशिकला दोन हजार ५०४, तर अहमदनगरला दोन हजार ३९२ शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. मुदत संपेपर्यंत अधिक मागणी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या, लोकसंख्येच्यादृष्टीने मोठा आहे. शेतकरी संख्याही फार मोठी आहे. पण अर्ज मात्र ८३७ आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नाही. योजनेचा प्रसार, प्रचार करण्यास कृषी विभाग कमी पडला आहे. त्यानंतर अर्ज आॅनलाईन भरायचे आहेत. अनेक ठिकाणी ही सुविधा नसल्याने, शासकीय पातळीवर याबाबत सहकार्याची कमतरता राहत असल्यानेही आकडा अल्प राहिला आहे. शेतकऱ्यासाठी जवळपास ५० हजार रुपये शेतकऱ्याला प्रथम स्वत:जवळचे गुंतवायचे आहे. सद्यस्थितीत होरपळलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती त्यात गुंतवणूक करण्याची नाही. बँकांचे कृषी कर्ज, वीज पंपाचे बिल चुकविण्याला त्यांची प्राथमिकता राहिली आहे. या व इतर कारणांमुळेही जिल्ह्यात शेततळ्यांसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे सांगितले जाते. (तालुका प्रतिनिधी)