शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

‘वसंत’च्या निवडणुकीकडे सहकार क्षेत्राचे लागले लक्ष

By admin | Updated: June 14, 2015 02:43 IST

येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या वसंत जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीची निवडणूक येत्या २१ जूनला होत आहे.

वणी : येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या वसंत जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीची निवडणूक येत्या २१ जूनला होत आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. शुक्रवारी ७४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १७ संचालकांच्या जागेसाठी ५३ उमेदवार रिंगणात उरले आहे. त्यात तीन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.येथील वसंत जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीचा वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यात मोठा विस्तार आहे. कोट्यवधी रूपयांची मालमत्ता असलेल्या या संस्थेवर सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये नेहमीच चढाओढ असते. या संस्थेचे तीनही तालुक्यात एकूण नऊ हजार १२२ सभासद आहेत. या संस्थेची सन २०१५-२०२० या पाच वर्षांसाठी संचालक मंडळ निवडण्यासाठी येतया २१ जूनला निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी वणी, मारेगाव व झरी या तीनही तालुक्यात विविध ठिकाणी २१ मतदान केंद्रे ठेवण्यात आले आहे. मतदान अधिकारी म्हणून ए.के.नाईक, सहाय्यक मतदान अधिकारी भगत व व्यवस्थापक शा.झी.कोसारकर काम पाहात आहे. संस्थेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून १२, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एक, एन.टी.व्ही.जे. गटातून एक व महिला गटातून दोन, असे एकूण १७ उमेदवार निवडले जाणार आहे. सुरूवातीला निवडणुकीसाठी १३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये निवडणूक निर्ण्य अधिकाऱ्यांनी चार अर्ज अवैध ठरविले. उर्वरित १२७ उमेदवारांपैकी शुक्रवारी ७४ उमेदवारांनी अर्ज मागे मागे घेतले आहेत. त्यामुळे आता १७ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात कायम आहेत. त्यात काँग्रेसच्या पॅनलला अंगठी बोधचिन्ह मिळाले आहे. भाजपा-शिवसेना-एकरे यांच्या पॅनलला कपबशी, तर ऐनवेळी तयार झालेल्या मनसे-राष्ट्रवादी यांच्या पॅनलला पतंग बोधचिन्ह मिळाले आहे. दोन उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)उपविभागातील ‘सहकारा’तील महत्वाची संस्थावणी, मारेगाव आणि झरी तालुक्यात वसंत जिनींग ही सहकारातील अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच या संस्थेवर सत्ता मिळविण्यासाठी तीनही पॅनलने कंबर कसली आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात आणि विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड.देविदास काळे यांच्या नेतृत्वात विद्यमान सत्ताधारी वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, सहकारातील बडे प्रस्थ अ‍ॅड.विनायक एकरे यांच्या नेतृत्वात विरोधक आव्हान देण्याच्या तयारीत आहे. सोबतच राष्ट्रवादीचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वातील तिसरे पॅनल या दोनही पॅनलला पराभूत करून सहकारात झेंडा रोवण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीला आता चांगलीच रंगत येत आहे.