शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजमध्ये क्लबफूट शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 21:53 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्लबफूट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अनेकवेळा लहान मुलांच्या पायांमध्ये, हातामध्ये व इतर ठिकाणच्या सांध्यात वाक येतो. त्यामुळे त्याला अपंगत्व येते. यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यास हे अपंगत्व सहज घालविता येते.

ठळक मुद्देअस्थीव्यंगोपचार विभाग : डॉक्टरांना दिले प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्लबफूट शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अनेकवेळा लहान मुलांच्या पायांमध्ये, हातामध्ये व इतर ठिकाणच्या सांध्यात वाक येतो. त्यामुळे त्याला अपंगत्व येते. यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यास हे अपंगत्व सहज घालविता येते. यासाठीच ‘मेडिकल’मध्ये अस्थीव्यंगोपचार विभागातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले असून आता ही सेवा यवतमाळातही मिळणार आहे.क्यूअर इंडिया या संस्थेच्यावतीने राज्यात ट्रिट क्लबफूट टूडे हे अभियान राबविले जात आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय यांच्यावतीने या मोहिमेबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र स्टेट लेव्हल क्लब फूट मॅनेजमेंट प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थीव्यंगोपचार विभागातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण भागात व गरीब कुटुंबातील मुलांमध्ये पायाला वाक असणे, हाताला वाक असणे ही व्याधी दिसून येते. मात्र जन्मत:चा आजार समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उपचार असतानाही एखाद्या दिव्यांगाप्रमाणे ही मुलं जगतात. योग्यवेही वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया केल्यास त्यांच्या हातापायाला असलेला वाक पूर्णत: घालविता येऊ शकतो. त्यासाठी काही जुजबी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. अशा शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण मेडिकलमधील डॉक्टरांना देण्यात आले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम वैद्यकीय महाविद्यालयात प्रभावीपणे राबविला जाईल, असे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांनी सांगितले. गरीब रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन केले आहे. 

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेजYavatmalयवतमाळ