शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत धान्य खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:59 IST

वणीच्या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असताना अडत्यांनी गुरूवारपासून धान्य लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गुरूवारपासून बाजार समितीतील खरेदी-विक्री ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देविविध मागण्या : अडत्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणीच्या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असताना अडत्यांनी गुरूवारपासून धान्य लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गुरूवारपासून बाजार समितीतील खरेदी-विक्री ठप्प होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात अडते युनियन संघाने बाजार समितीला निवेदन दिले आहे.३ आॅक्टोबरपासून वणीच्या बाजार समितीत सोयाबीनच्या खासगी खरेदीला प्रारंभ झाला. सोयाबीनला भाव चांगला मिळू लागल्याने बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी दररोज शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली. अशातच मंगळवारी अडते युनियन संघाने बाजार समितीच्या सभापतींना निवेदन देऊन अडत्यांच्या मागण्या पूर्ण होईस्तोवर ११ आॅक्टोबरपासून धान्य खरेदी बंद ठेवण्याबाबत निवेदन दिले. वणीच्या बाजार समितीत ७० ते ७५ परवानाधारक अडते असले तरी प्रत्यक्षात २५ ते ३० अडते काम करतात. अडते युनियन संघाच्यावतीने मागण्यांच्या पूर्ततेसाठी वणी बाजार समितीला वारंवार निवेदने देऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र त्या पूर्ण न झाल्याने अडते युनियन संघाने जोवर मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत धान्य लिलावात भाग घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.बाजार समितीच्या परवानाधारक धान्य व्यापाºयांनी खुल्या लिलावाद्वारे खरेदी केलेल्या धान्य मालाच्या चुकाºयाची पाच-सहा महिन्यापासूनची रक्कम धान्य अडत्यांना अद्यापपर्यंत दिली नाही. बाजार समितीमध्ये ई-नाम योजनेअंतर्गत ई-लिलाव व ई-पेमेंटची पद्धत असूनही १ आॅक्टोबर २०१८ पासूनच्या धान्य चुकारांच्या रकमा संबंधित शेतकºयांच्या व अडत्यांच्या खात्यांमध्ये अद्याप जमा करण्यात आल्या नाही. त्या जमा करण्यात याव्या, बाजार समितीने अनेक व्यापाºयांना धान्य खरेदीचे परवाने दिले आहेत. परंतु ई-लिलावामध्ये मोजकेच व्यापारी भाग घेतात. सध्या नवीन सोयाबीन बाजार समितीमध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत पुरेसे धान्य व्यापारी लिलावामध्ये सहभागी असणे गरजेचे असल्याचे अडते युनियन संघाचे म्हणणे आहे. बाजार समितीच्या आवाराबाहेर अनेक ठिकाणी विना परवाना धान्य मालाची खरेदी सुरू असून ती बंद करण्याची मागणी आहे. सर्व अडत्यांना ४ सप्टेंबरपासून जीएसटीच्या कक्षात आणण्यात आले आहे. बाजार समितीत काम करणाऱ्या परवानाधारक अडत्यांना त्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी आहे.शेतकऱ्यांना आता केवळ तारण योजनेचा आधारगुरूवारपासून अडत्यांनी धान्य लिलावात भाग न घेण्याची भूमिका घेतल्याने बाजार समितीत धान्य विक्रीसाठी येणाºया शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. ती होऊ नये, यासाठी शेतकºयांना तारण योजना आधार ठरणार असल्याचे सभापती संतोष कुचनकार यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड