शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगाव, दारव्हा येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:06 IST

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बाभूळगाव आणि दारव्हा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाभूळगाव येथे यवतमाळ-धामणगाव मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरण्यात आली. दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्दे चोख बंदोबस्त : टायर पेटवून वाहतूक रोखली

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव/दारव्हा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बाभूळगाव आणि दारव्हा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाभूळगाव येथे यवतमाळ-धामणगाव मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरण्यात आली. दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला होता.बाभूळगाव परिसरातील नागरिक येथील बसस्थानकासमोरील यवतमाळ-धामणगाव मार्गावर सकाळी ११.३० वाजता ठाण मांडून बसले होते. यवतमाळ, धामणगाव, नेर, कळंब जाणारे सर्व मार्ग रोखून धरले. शहरातील सर्व दुकाने बंद होती. तहसीलदार दिलीप झाडे, पोलीस निरीक्षक अनिल पाटील, निवासी नायब तहसीलदार एम.बी. मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. पाटोळे घटनास्थळी दाखल झाले. सकाळी तालुक्यातील आरेगाव येथे एसटी महामंडळाची दारव्हा-पूलगाव बस रोखून धरली. तहसीलदार व ठाणेदार पोहोचल्यानंतर दीड तासानंतर ही बस रवाना झाली. बाभूळगाव येथे डेहणी मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखली. सर्वांच्यावतीने दिलीप वाघमारे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.दारव्हा येथे भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालय, एसटी बस बंद ठेवली होती. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी अंबिकानगरातील सम्राट अशोक बुद्धविहारात एकत्र आले. त्यानंतर मोर्चाने शहरातील व्यापाºयांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. दारव्हा आगाराच्या बसेस पूर्णत: बंद होत्या. शहरासह तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.आर्णी तालुक्यातील बोरगाव दाभडी येथे टायर जाळून आर्णी-तळणी मार्ग बंद करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.लाल दिवा नसणे अडचणीचेबाभूळगाव येथे रस्ता रोको दरम्यान तालुका दंडाधिकाºयाचे वाहन आंदोलनस्थळी पोहोचले. मात्र यावर लाल दिवा नसल्याने आंदोलकांनी प्रवासी वाहन समजून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर तालुका दंडाधिकाऱ्याचे वाहन असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलनकर्ते थांबले. लाल दिवा नसल्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळने कठीण होत आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव