लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : नगरपंचायतीने येथे वाहतुकीला अडथळा ठरणाºया अतिक्रमणावर शुक्रवारी बुलडोझर चालविला. यामध्ये व्यावसायिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या कारवाईचा निषेध म्हणून सोमवारी व्यापाºयांनी एकत्र येत बाजारपेठ बंद ठेवली.प्रत्येक दुकानधारकांना १० फुटाचे टिनशेड उभारण्यास परवानगी द्यावी, अतिक्रमण हटाव मोहिमेत दुकानदारांचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, यापुढे कोणीही अतिक्रमण करणार नाही याची काळजी घ्यावी, रस्त्यावर उभ्या असणाºया हातगाड्यांचा बंदोबस्त करावा आदी मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष दिगांबर मस्के यांना देण्यात आले.यावेळी महेश जयस्वाल, शेख मुश्ताक, नय्यर भाई, संजय फाळे, संजय कुबडे, वासुदेव वादाफळे, रमेश कारिया, दासभाई सुचक, चंद्रशेखर खसाळे, विजय नवाडे, मोहन झोडे, मधुकर गोहणे, शैलेश कारिया, भोला रुपारेल, सलीम मुसानी, कासम मुसानी, अकील अहेमद, शिशिर खंगार, प्रवीण खडसे, प्रशांत डेहनकर, अन्सारभाई, विजय देशमुख आदी उपस्थित होते.
कळंब शहरात व्यापाºयांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:52 IST
नगरपंचायतीने येथे वाहतुकीला अडथळा ठरणाºया अतिक्रमणावर शुक्रवारी बुलडोझर चालविला.
कळंब शहरात व्यापाºयांचा बंद
ठळक मुद्देनुकसानभरपाई हवी : नगरपंचायतच्या अतिक्रमण हटावला विरोध