उमरखेड : स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बुधवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने येथील संजय गांधी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनो विदर्भ द्या, विदर्भ राज्य स्वतंत्र कधी होणार, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केव्हा होणार आदी प्रश्न आंदोलनकर्त्यांनी यावेळी उपस्थित केले. वेगळ््या विदर्भ राज्यासाठी चक्काजाम आंदोलन होणार असल्याची माहिती पोलीस ठाण्याला असल्याने आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांनी चोख बंदोबस्त केला होता. रास्तारोकाच्या प्रयत्नात नागरिक असतानाच त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. अॅड़ संतोष जैन, सुरेंद्र कोडगिरवार, अॅड़ विलास देवसटकर, आनंद चिकणे, डॉ. वि.ना. कदम, मजहरखाँ टेलर, सलमान खान अजहर, डॉ. रहीम अंबेजोगाईकर, मतलुबभाई, सुनील महामुने, व्ही.एच. हनवते, मो. समी पेन्टर, अफसर ठेकेदार, डॉ. स्वप्नील कनवाळे, शे. रफीक टेलर, अनिल धोंगडे, जकी उल्ला खान, अजहर खाँ मजहर खाँ आदींना पोलिसांनी स्थानबद्ध केले. (प्रतिनिधी)
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी चक्काजाम
By admin | Updated: January 12, 2017 00:45 IST