शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंदे बंद करा, कायदा व सुव्यवस्था राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:41 IST

आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा, असे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी उपविभागातील ठाणेदारांना दिले.

ठळक मुद्देउपमहानिरीक्षकांचे पुसदमध्ये आदेश : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नऊ ठाण्यांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा, असे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी उपविभागातील ठाणेदारांना दिले.येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व वाहतूक शाखेच्या वार्षिक निरीक्षणासाठी उपमहानिरीक्षक तरवडे मंगळवारी पुसदला आले होते. त्यांनी उपविभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वच ठाणेदारांना त्यांनी अवैध धंद्यावर नियंत्रण मिळवून प्रलंबित गुन्हे तत्काळ उघडकीस आणण्याची सूचना दिली. या बैठकीला उपविभागातील नऊ ठाणेदार उपस्थित होते. त्यांनी प्रत्येकाची स्वतंत्र भेट घेऊन संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगिरीचा आढावा घेतला.मुली व विद्यार्थिनींची छेडखानी थांबविण्याचे तसेच मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी पालकांना सहकार्य करण्याचेही सूचित केले. सामान्य जनतेला तपास करताना त्रास होणार नाही, याची पोलिसांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही तरवडे यांनी दिले.मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांचा ताफा शहरात पोहोचला. प्रथम त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार धनंजय सायरे, रवींद्रनाथ भंडारे, संजय चौबे, ब्रिजपालसिंह ठाकूर, हनुमंतराव गायकवाड, उन्हाळे, राऊत, लहू टावरे, राठोड, वाहतूक शाखेचे एपीआय धीरज चव्हाण उपस्थित होते.पुसद एसडीपीओ कार्यालयाचे कौतुकयेथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला भेट दिल्यानंतर श्रीकांत तरवडे यांनी परिसराची पाहणी केली. परिसरातील स्वच्छता, रेकॉर्ड व चांगल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. शेरेबुकात त्यांनी गुड रिमार्क नोंदविला. मात्र येथील वाहतूक शाखेच्या कामकाजाबाबत सर्वसाधारण रिमार्क दिल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Policeपोलिस