शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाच बनविले ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:45 IST

शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवशीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचे नवनवीन प्रयोग आणि त्यातून मिळविलेले उत्पन्न यासंदर्भातील माहिती मिळणे अपेक्षित होते.

ठळक मुद्देयशोगाथा सांगणारे स्टॉल अपुरे : कृषी महोत्सवाच्या चर्चासत्रात तिसऱ्या दिवशीही खुर्च्या रिकाम्याच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवशीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचे नवनवीन प्रयोग आणि त्यातून मिळविलेले उत्पन्न यासंदर्भातील माहिती मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ही माहिती थोडी आणि शेतकऱ्यांना ग्राहक बनवून विक्रेत्यांचेच भले करण्याचा उद्देश स्पष्ट झाला.महागडे ट्रॅक्टर, ड्रिप, मोटरपंप, सोलरपंप, विविध प्रकारचे बियाणे बुकिंग याच्या स्टॉलची संख्या अधिक आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, फोन नंबर आणि पत्ता लिहून घेतला जात होता. आपली कंपनी आणि त्यांचे प्रॉडक्ट किती चांगले आहे याची माहिती प्रत्येक जन देत होता.कृषी प्रदर्शनात येणारा शेतकऱ्याला इतर यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा न कळता, कुठल्या कंपनीचे उत्पादन किती चांगले, त्यांच्या किमती किती, याचेच पॉम्पलेट घेऊन जाताना दिसत होते. शेतकऱ्यांना अपेक्षित गुलाबी बोंडअळीवर मात करणारे कपाशीचे संशोधित वाण दिसले नाही. कृषी महोत्सव म्हणजे मोठ्या कंपन्यांसाठी ग्राहक शोधून देणारा उत्सव ठरला. या ठिकाणी चर्चासत्रांसाठी शेतकरीच नाहीत. तीन दिवसांपासून अशीच अवस्था आहे. चर्चासत्राच्या ठिकाणी सतत रिकाम्या खुर्च्या आणि आठ-दहा शेतकरी, अशी अवस्था आहे.किसान काँग्रेस करणार राज्यपालाकंडे तक्रारकृषी महोत्सवावर २५ लाखांचा खर्च होत आहे. मात्र शेतकरीच महोत्सवापासून दूर आहे. सहा हजाराचा स्टॉल २० हजारात देण्यात आला. महोत्सवात बाहेरगावाच्या नावावर भोजनाचे स्थानिक स्टॉल असल्याचा आरोप किसान काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. महोत्सवाचा २५ लाखांचा खर्च अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा. महोत्सवातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी किसान काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार, माजी आमदार विजयाताई धोटे, शहर काँग्रेस अध्यक्ष चंदू चौधरी, महिला शहर अध्यक्ष उषा दिवटे, प्रदीप डंभारे, उमेश इंगळे, अजय किनकर, घनश्याम अत्रे, अरूण ठाक ूर आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या नावावर शिरले व्यापारीकृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनी स्टॉल लावल्याचा संशय बळावला आहे. काही उत्पादने कलर मिश्रित असल्याचा प्रकार उघड झाला. ग्राहकांना घरी आल्यानंतर याचा उलगडा झाला. खास करून सोपेबाबत हा प्रकार घडला. त्याची महोत्सवातील किंमत आणि बाजारातील दर सारखेच आहे. यामुळे ग्राहकांची नाराजी झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती