शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भांडण मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या दोन गटांत झडप, एकाची हत्या, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 05:00 IST

आरोपी दवाखाना परिसरात दारू पित होते. त्यावरून त्यांना नयन व त्याच्या मित्राने हटकले. त्याच वेळी आरोपींनी नयनला शिवीगाळ करीत मारहाण केली. हा वाद मनोज कनोजिया याने मध्यस्थी करून सोडविला. त्यावेळी जाताना आरोपींनी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर, हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी वैभव नाईक व त्याच्या मित्रांना जयभीम चौकात बोलविण्यात आले. तेथे दबा धरून असलेल्या आरोपींनी एकाच वेळी तिघांवर धारदार चाकूने हल्ला केला. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जयभीम चौक पाटीपुरा परिसरातील दवाखान्याजवळ सात जण दारू पित होते. यावरून त्यांना दोघांनी हटकले. त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.  हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी शनिवारी रात्री १०.४५ वाजता दोन्ही गट एकत्र आले. त्यावेळी नऊ जणांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. वैभव कृष्णराव नाईक (२३) रा.बांगरनगर असे मृताचे नाव आहे, तर नयन नरेश सौदागर (२२) रा.विठ्ठलवाडी व सुहास अनिल खैरकार (२६) रा. अशोकनगर पाटीपुरा हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला आरोपी शुभम वासनिक (२६), बंटी उर्फ रत्नदीप पटाले (२२), करण तिहले (२३), अर्जुन तिहले (२२), रोशन उर्फ डीजे नाईक (२५), प्रथम रोकडे (२१), अभी कसारे (२०) व इतर तीन जण सर्व रा.जयभीम चौक पाटीपुरा यांनी केला. ३० एप्रिल रोजी पाटीपुरा परिसरातील सरकारी दवाखाना येथे नयन सौदागर, वैभव नाईक, सुहास खैरकार यांचा आरोपींशी वाद झाला होता, आरोपी दवाखाना परिसरात दारू पित होते. त्यावरून त्यांना नयन व त्याच्या मित्राने हटकले. त्याच वेळी आरोपींनी नयनला शिवीगाळ करीत मारहाण केली. हा वाद मनोज कनोजिया याने मध्यस्थी करून सोडविला. त्यावेळी जाताना आरोपींनी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर, हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी वैभव नाईक व त्याच्या मित्रांना जयभीम चौकात बोलविण्यात आले. तेथे दबा धरून असलेल्या आरोपींनी एकाच वेळी तिघांवर धारदार चाकूने हल्ला केला. वैभव नाईक याच्या काखेत चाकूचा वार लागला. त्यात तो जागीच गतप्राण झाला, तर तेथून नयन सौदागर व सुहास खैरकार यांनी पळ काढला. मात्र, आरोपींनी पाठलाग करून  त्यांच्यावरही चाकूने वार केले. आरडाओरडा होताच, घटनास्थळावरून आरोपी पसार झाले.  नयनच्या पाठीवर तर सुहासच्या डोक्यात चाकूचा वार आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ जखमींना घटनास्थळावरून उचलून शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे वैभवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर इतर दोघांवर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर पाटीपुरा परिसरातील जुन्या हत्याकांडाची मालिका पुन्हा सुरू होते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी आदेश अनिल खैरकार याने दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पाेलिसांनी कलम ३०२, ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

जखमी व मृतक आले होते पॅरोलवर  - पाटीपुरा परिसरातील अनिल विजय थूल याच्या खुनात न्यायालयाने २०१७ मध्ये वैभव नाईक, सुहास अनिल खैरकार यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यांच्यासह आठ जणांचा या हत्याकांडात समावेश आहे. हे सर्व नोव्हेंबर, २०२१ पासून कोविड पॅरोल रजेवर आहेत. याच दरम्यान त्यांचा वाद झाला व शनिवारी रात्री हत्याकांड घडले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी