शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

नागरी हक्क संरक्षण विभागाला विदर्भात ‘एसपी’च नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 15:41 IST

अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महत्वाची भूमिका वठविणाऱ्या नागरी हक्क संरक्षण (पीसीआर) विभागाला नागपूर व अमरावती येथे एसपीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देअमरावती-नागपूरची जागा रिक्त अतिरिक्त प्रभार थेट नांदेडकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महत्वाची भूमिका वठविणाऱ्या नागरी हक्क संरक्षण (पीसीआर) विभागाला नागपूर व अमरावती येथे एसपीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संपूर्ण विदर्भाचा कारभार नांदेडवरून हाकला जात आहे.नागरी हक्क संरक्षण हा राज्य पोलीस दलातील महत्वाचा विभाग आहे. परंतु या विभागाला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जणू ग्रहण लागले आहे. पाच जिल्ह्यांसाठी पोलीस अधीक्षक या विभागाचा प्रमुख आहे. त्यांच्या अधिनस्त उपअधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक अशी अधिकाऱ्यांची फौज असते. परंतु आजच्या घडीला अमरावती विभागात या सर्व जागा रिक्त आहेत. एका सहायक पोलीस निरीक्षकाकडे एसपींचा प्रभार आहे. कमी जास्त प्रमाणात अशीच स्थिती नागरी हक्क संरक्षण विभागात पाचही जिल्ह्यात आहे. यवतमाळला तर सहायक निरीक्षकही नाही. वाशिमच्या समकक्ष अधिकाऱ्याकडे यवतमाळची अतिरिक्त जबाबदारी आहे.नागपूर विभागाचा कारभारही अमरावतीप्रमाणेच आहे. तेथेही ‘पीसीआर’च्या पोलीस अधीक्षकाची जागा रिक्त आहे. याशिवाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागाही रिक्त आहेत. त्यामुळे कामकाज प्रभावित होते. नांदेडला अपर्णा गिते या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षक आहेत. त्यांच्याकडे नागपूर व अमरावतीच्या पीसीआर एसपींची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थात गिते यांच्याकडे विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे दीड डझन जिल्ह्यांचे नागरी हक्क संरक्षणाचे कामकाज देण्यात आले आहे. नांदेडहून अमरावती व नागपूरचा प्रभार सांभाळताना प्रशासनाला बरीच कसरत करावी लागते.

वर्षभरात अडीच हजारांवर गुन्हेअ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नागरी हक्क संरक्षण विभागाची चमू संबंधित पोलीस ठाणे व गावात भेटी देतात. प्रकरणाची खातरजमा करतात. आणखी माहिती गोळा करतात. या विभागाच्या शिफारसीवरुनच अ‍ॅट्रोसिटी प्रकरणातील पीडिताला सामाजिक न्याय विभागामार्फत धनादेश वितरित होतो. राज्यभरात वर्षाकाठी अडीच हजारांवर अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे नोंदविले जातात. या गुन्ह्यांच्या प्रकरणात प्रभावी काम करण्यासाठी पुरेशी यंत्रणा लागते. मात्र नागरी हक्क संरक्षण विभागाकडे त्याचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.‘साईड ब्रँच’ कायम दुर्लक्षितनागरी हक्क संरक्षण विभाग हा पोलीस दलात साईड ब्रँच म्हणून ओळखला जातो. अशाच पद्धतीने सीआयडी, एसआयडी, एसीबी यासुद्धा साईड ब्रँच म्हणून गणल्या जातात. परंतु या साईड ब्रँचकडे गृहमंत्रालयाचे सातत्याने दुर्लक्ष होते आहे. वास्तविक सीआयडी ही राज्य पोलीस दलाची तपास करणारी महत्वाची संस्था आहे. एसआयडी अर्थात राज्य गुप्तवार्ता विभाग हा राज्य शासनाचे कान-नाक-डोळे समजला जातो. परंतु या विभागाकडेच शासनाचे लक्ष नाही. पर्यायाने तेथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात. एसीबी व अन्य साईड ब्रँचची स्थिती यापेक्षा वेगळी नाही.

टॅग्स :Policeपोलिस