शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

शहर स्वच्छतेचे भिजत घोंगडे कायम

By admin | Updated: April 1, 2015 02:07 IST

शहरातील स्वच्छता कंत्राटा विरोधात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा ...

यवतमाळ : शहरातील स्वच्छता कंत्राटा विरोधात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. तर तात्पूरता कंत्राटाराजवळ कर्मचारीच नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. याच मुद्दावर नरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभेत कोंडीत पकडले. मंगळवारी झालेल्या सभेत सफाई कंत्रटावर कोणताच ठोस निर्णय झाला नाही. आर्थिक वर्षातील शेवटच्या दिवशी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत सर्वांच्या जिव्हाळ््याचा महत्वपूर्ण स्वच्छता कंत्राटाचा मुद्दा वगळता सर्व विषय मंजूर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा स्थगिती आदेश असल्याने कंत्राटाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. ज्या दोन संस्थाना एक महिन्याचे तात्पूरते सफाई कंत्राट देण्यात आले होते त्यांनी सुध्दा हातवर केले आहे. गेल्या २० दिवसापासून शहरातील घंटागाड्या, नाल्या काढणे बंद आहे. बाबा ताज आणि संत गाडगेबाबा या दोन संस्थाना एक महिन्याचे तात्पूरते कंत्राट देण्यात आले होते. त्यांचीही मुदत संपली आहे. या संस्थानी करारा प्रमाणे कर्मचारी दिले नाही. त्यांची रक्कम कापण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक प्रवीण प्रजापती, गजानन इंगोले यांनी केली. शहरात सध्या अकरा ट्रॅक्टरवर २२ कर्मचारी फिरत आहेत. प्रत्यक्षात कुठेच सफाईचे काम केले जात नाही. अनेक नगरसेवकांनी स्वखर्चातून सफाई कामगारांची व्यवस्था केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढावा, अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी केली. यानंतर सभागृहाने प्रभाग एक मधील नालीचे बांधकामाची निविदा, तलावफैैल परिसरात खडीकरण, नेहरू उद्यानाच्या बाजूला गणेश मुर्ती व दुर्गादेवीची मुर्ती विर्सजनासाठी १० लाख रुपयांचा हौद बांधकामाला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. शहरातील पथदिवे दुरूस्ती आणि साहित्य पुरवठ्यांच्या कमी दराच्या निविदेला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर विषय क्रमांक पाच ते १२ हे सफाई कंत्राटाशी निगडीत असल्याने त्याला स्थगिती असल्यामुळे कोणतीच चर्चा झाली नाही. सर्वसाधरण सभेला २८ नगरसेवक उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)