शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘सीओ’कडून शहर विद्रूपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:21 IST

शहरात फलकबाजीला उत आला असून यात चक्क नगरपरिषद प्रशासनच आघाडीवर आहे. शहर स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावताना आपणच शहराच्या सौंदर्याची ऐसीतैसी करतोय याचे भान पालिका प्रशासनाला राहिले नाही.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : फलकबाजीला उत आल्याने नगरसेवकाची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात फलकबाजीला उत आला असून यात चक्क नगरपरिषद प्रशासनच आघाडीवर आहे. शहर स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावताना आपणच शहराच्या सौंदर्याची ऐसीतैसी करतोय याचे भान पालिका प्रशासनाला राहिले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाची तसेच शहर विद्रूपीकरण कायद्याचे नगरपरिषद मुख्याधिकारीच उल्लंघन करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.गल्लीबोळीतील टिनपाट नेतेमंडळी गावात न केलेल्या कामांचेही मोठमोठे फलक लावतात. या फलकबाजीमुळे शहरातील प्रमुख चौकांची स्थिती अतिशय बकाल झाली आहे. नगरपरिषदेने याहीपुढे एक पाऊल टाकत एकही पथदिव्याचा खांब फलक लावण्यावाचून सोडलेला नाही. पालिका प्रशासनच कायद्याची पायमल्ली करत असल्याचे पाहून फ्लेक्स व नेत्यांना चांगलाच जोर चढला.नगरपरिषद कार्यालयासमोरच अवाढव्य असे फ्लेक्स लावले आहे. पथदिव्याला समांतर असे फलक लावल्यामुळे तिथे अपघाताची स्थिती निर्माण झाली होती. पालिका पदाधिकाºयाचे हे फलक काढल्यानंतर दुसºयाच एका पक्षातील पदाधिकाºयाचे फलक लागले. सुरू असलेल्या फलकबाजीवरून निवडणुकांचे वेध लागल्याचे स्पष्ट होत आहे. कामापेक्षा आपल्या फलकावरील फोटोची उंची किती वाढविता येते याची स्पर्धा सुरू आहे. या फलकबाजीला नगरपरिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरेच खतपाणी घालत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवकाने जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली असून मुख्याधिकारी ढेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाची अवमानना केली आहे.ज्यांनी शहर विद्रूपीकरण कायद्याची अंमलबजावणी करावी तीच व्यक्ती उल्लंघन करत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.