शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

‘मजीप्रा’च्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:00 AM

चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. चापडोहच्या पाण्यावरील बहुतांश टाक्यांवरून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देदहा दिवसांपासून नळ नाही । चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावरील टाक्यांमध्ये ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कामाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रकल्पामध्ये भरपूर पाणी असतानाही दहा-दहा दिवसपर्यंत पाणी मिळत नाही. विकतच्या आणि हातपंपाच्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. शिवाय या विभागातील अधिकाऱ्यांमध्येही समन्वयाचा अभाव दिसून येतो. नळ कधी येणार याचा दिवस आणि वेळेविषयीसुद्धा नक्की सांगितले जात नाही.चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर भरल्या जाणाºया शहरातील दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव, सुयोगनगर, वैभवनगर, लोहारा आदी आठही टाक्यांमध्ये ठणठणाट आहे. प्राधिकरणाने दर्डानगर टाकीजवळ मोठे काम हाती घेतले. यासाठी लागणाºया वेळेचा अंदाज न घेता कामाला सुरुवात करण्यात आली. चापडोहच्या पाण्यावरील बहुतांश टाक्यांवरून आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागातील आठ दिवसांनंतरचा नवव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा या कामामुळे थांबला गेला. आठ अधिक तीन असे ११ दिवस पाणी पुरविण्याचा प्रश्न या नागरिकांपुढे आहे. सदर काम लवकरच पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले जात आहे.सिंघानियानगर परिसरातील हजारो नागरिकांना हातपंप किंवा विहिरीच्या पाण्यावर आपली गरज पूर्ण करावी लागणार आहे. पिण्यासाठी त्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था न करताच कामे काढण्याची सवयच जणू या विभागाला झाली आहे. शहराला दोन प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दोनही प्रकल्पांसाठी वेगवेगळे अधिकारी, कर्मचारी आहेत. एकमेकांच्या कामाविषयी ते कुठलीही माहिती ठेवत नसल्याची बाब पुढे आली आहे. तांत्रिक कामे सांभाळणारे अधिकारीही गंभीर नसल्याचे दिसून येते. कार्यकारी अभियंत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.नळाद्वारे सांडपाणीयवतमाळ शहरात अनेक ठिकाणी नळाची पाईपलाईन लिकेज आहे. सांडपाणी वाहून जाण्याच्या नालीतून जुन्या लाईन गेलेल्या आहेत. लिकेज पाईपमध्ये शिरणारे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात जात आहे. शुद्ध पाण्याचा दावा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला लोकांच्या आरोग्याविषयी काही देणेघेणे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण