कंटेनमेंट झोनमधील नागरिक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:40+5:30

कळंब चौक मार्गावर आरटीओ ऑफीसच्या मागील बाजूला तायडेनगर परिसर आहे. ९ जुलै रोजी सकाळी तेथील नागरिक अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. सील केलेल्या परिसराच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. आम्हाला घरात खाण्यासाठी काही नाही, शासन दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देत नाहीत किंवा आम्हालाही या वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू दिले जात नाही.

Citizens from the containment zone took to the streets | कंटेनमेंट झोनमधील नागरिक उतरले रस्त्यावर

कंटेनमेंट झोनमधील नागरिक उतरले रस्त्यावर

Next
ठळक मुद्देतायडेनगरात संताप : सोई-सुविधांचा अभाव, रहिवाशांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रहिवासी परिसर सील केला गेला. परंतु तेथील नागरिकांना आवश्यक सोई-सुविधा प्रशासनाकडून पुरविल्याही गेल्या नाहीत किंवा त्यासाठी बाहेरही पडू दिले जात नाही. याच मुद्यावर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता तायडेनगरातील नागरिक रस्त्यावर उतरले होते.
कळंब चौक मार्गावर आरटीओ ऑफीसच्या मागील बाजूला तायडेनगर परिसर आहे. ९ जुलै रोजी सकाळी तेथील नागरिक अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. सील केलेल्या परिसराच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. आम्हाला घरात खाण्यासाठी काही नाही, शासन दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देत नाहीत किंवा आम्हालाही या वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू दिले जात नाही. अनेकांना औषधी, दवाखाने, ड्युटी व इतर कामांच्या निमित्ताने बाहेर जायचे आहे. मात्र त्यांना रोखले जात आहे. अशा स्थितीत आम्ही काय करायचे असा सवाल तायडेनगरातील नागरिकांनी उपस्थित अधिकाºयांना विचारत त्यांना धारेवर धरले. पोलिसांचा अतिरेक होत असल्याची ओरडही यावेळी ऐकायला मिळाली. नागरिक रस्त्यावर उतरल्याचे कळताच संबंधित शासकीय अधिकाºयांनी तायडेनगर गाठून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत काढली गेली. लवकरच व्यवस्था होईल, अशी ग्वाही त्यांना दिली गेली. त्यामुळे तणाव निवळला.

वीज, पाणी, मजुरीची समस्या
तायडेनगर परिसरात कोरोनाचे एकापाठोपाठ रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. एकीकडे सतत घरात राहावे लागत असताना वीज पुरवठा सहा-सहा तास खंडित राहात आहे. तर नळाला पाणीपुरवठाही अनियमित होत आहे. कोरोना संकटासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेले कोट्यवधी रुपये आणि १० हजार धान्य किट प्रशासनाकडे पडून असतानाही त्या आम्हाला का वाटप केल्या जात नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला.

Web Title: Citizens from the containment zone took to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.