शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 24, 2015 00:07 IST

रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या ...

अपघाताची भीती : बंदोबस्तासाठी पुढाकारच नाहीउमरखेड : रस्त्याच्या मधोमध उभा असलेला जनावरांचा कळप. दुकानदारांना दररोज त्रस्त करणारी जनावरे. ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी आणि वेळप्रसंगी टक्कर खेळणारी मोकाट जनावरे उमरखेड शहरात नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त मात्र करण्यास कुणीही पुढे येत नाही.उमरखेड शहराच्या मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. जनावरांचा हैदोस एवढा वाढला आहे की, नागरिकही जनावर दिसले की, काढता पाय घेतात. येथील नांदेड, ढाणकी, महागाव आणि पुसद रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचे कळप दिसून येतात. काही जनावरे तर चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन बसतात. कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाही. बसस्थानक परिसर, विश्रामगृह, तहसील, पंचायत समिती या भागात नागरिकांची दररोज गर्दी असते. त्याठिकाणीही मोकाट जनावरे दिसून येतात. या जनावरांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर चालून येण्याची भीती असते. मोकाट जनावरांमुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाजीपाला विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी जनावर भाजीपाल्यावर ताव मारतात. ग्राहकांच्या हातातील पिशव्यातही तोंड घालायला जनावरे मागे पाहत नाही. अनेकदा या जनावरांच्या टकरीही सुरू असतात. ऐन गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या टकरींमुळे वाहनधारकांची त्रेधा उडते. जीवाच्या भीतीने वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यातून अपघात होण्याची शक्यता असते. हा सर्व प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. परंतु नगरपरिषद या जनावरांना कोंडवाड्यात टाकत नाही. जनावर मालकांचाही शोध घेतला जात नाही. आज शेकडो जनावरे उमरखेडच्या रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. (शहर वार्ताहर)जनावरांच्या टकरींमुळे नागरिकांची त्रेधाउमरखेड शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या अनेकदा टकरी सुरू असतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. जनावरांच्या टकरींमुळे अनेकदा नागरिक आणि वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती असते. वर्दळीच्या मार्गावर या जनावरांच्या टकरीत सापडून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडतात. मात्र या जनावरांचा बंदोबस्त केला जात नाही. त्यांच्या मालकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी होत आहे.