लोकमत न्यूज नेटवर्कनेर : आर्णी येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद नेर शहरात उमटले. येथील जैन नवयुवक संघ व सर्वपक्षीयांच्यावतीने मोटरसायकल निषेध रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर महावीर भवनात निषेध सभा झाली. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, भाजपा तालुका अध्यक्ष पंजाबराव शिरभाते, नगरसेवक सुभाष भोयर, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजू देऊळकर, भाऊराव ढवळे, सुभाष खाडे, सुधाकर तायडे, नितीन माकोडे, आशीष खोडे, बन्शीलाल खिचा, श्रेणिक सिंगवी, तेजस सिंगवी, पुरुषोत्तम लाहोटी, राजेंद्र चिरडे, राजेश सिंगवी, विनोद जयसिंगपुरे, मोहन पापळकर, दीपक आडे, रूपेश गुल्हाने, विनोद कुळकर्णी, नरेंद्र लोडा, इरफान आकबानी, युवराज अर्मळ, दिनेश दावडा, नितीन खाबिया, अंकुश लोढा, आशीष नाहार, शैलेश लुणावत, नीलेश लुणावत, वैभव जडेकर, शालिक गुल्हाने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर्णीच्या घटनेचे नेरमध्ये तीव्र पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:36 IST
आर्णी येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद नेर शहरात उमटले. येथील जैन नवयुवक संघ व सर्वपक्षीयांच्यावतीने मोटरसायकल निषेध रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
आर्णीच्या घटनेचे नेरमध्ये तीव्र पडसाद
ठळक मुद्देरॅली काढून निषेध : तहसीलदारांना निवेदन, कारवाईची मागणी