शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बालविवाह; गाव समिती बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 19:24 IST

Yawatmal news एकीकडे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन गावेच्या गावे पिंजून काढत आहे. मात्र, तरीही अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत एका अल्पवयीन मुलीचा धूमधडाक्यात विवाह लावून देण्यात आला.

ठळक मुद्दे१५ वर्षांच्या मुलीचे आयुष्य पणालाप्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : एकीकडे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन गावेच्या गावे पिंजून काढत आहे. मात्र, तरीही अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत एका अल्पवयीन मुलीचा धूमधडाक्यात विवाह लावून देण्यात आला. गंभीर म्हणजे, या गुन्ह्यात खुद्द गाव समितीच सर्व माहिती असूनही शांत बसली. त्याहून गंभीर म्हणजे गाव समितीचे प्रमुख असलेले आजी व माजी सरपंच हेही वऱ्हाडी म्हणून या लग्नात सामील झाले.कळंब तालुक्यात यवतमाळ-पांढरकवडा महामार्गावरील एका खेड्यात बुधवारी हा बालविवाह वाजतगाजत पार पडला. याची खबर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळताच गुन्हा दाखल करण्याची धडपड सुरू झाली. मुलीला व संबंधितांना ताब्यात घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा चमू बाल कल्याण समितीसमोर आला.   संबंधित गावातील बालसंरक्षण समिती म्हणजे, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका हे सारेच या विवाहाच्या बाजूने उभे राहिले. पोलिसात तक्रार दाखल करण्यास कुणीही पुढे आले नाही. या गाव समितीने स्पष्ट नकार दिला. वास्तविक, या विवाहाची पूर्वकल्पना गाव समितीने जिल्हास्तरावर देऊन बालविवाह रोखणे नियमानुसार आवश्यक होते. असे न करता समिती सदस्यांनीच विवाहाला पाहुणे म्हणून हजेरी लावली. जिल्ह्यातील बाल कल्याण समितीने मुलीच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता, गुन्हा दाखल करण्यास ग्रामसेवक, पोलीस यांना आदेश न देता मुलीला अल्पवयात लग्न लावून देणाऱ्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे बाल कल्याण समिती व बाल न्याय यंत्रणेच्या कार्यतत्परतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कमी वयात प्रेम प्रकरणया प्रकरणातील मुलगी केवळ १५ वर्षांची आहे. गावातीलच २२ वर्षीय युवकासोबत तिचे लग्न लावण्यात आले. या दोघांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या काळात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाल्याने आता बदनामी टाळण्यासाठी घरच्या मंडळींनी लग्न लावून दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारात आता १५ वर्षांच्या कोवळ्या मुलीचे आयुष्य पणाला लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी