शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीसाठी थांबविलेल्या वाहनातील बालकाचा मृत्यू; संचारबंदीत बळी गेल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 20:23 IST

संचारबंदीत चौकशीसाठी जागोजागी थांबविलेल्या वाहनातील आजारी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यात घडली.

ठळक मुद्देकळंबची घटना

गजानन अक्कलवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संचारबंदीत चौकशीसाठी जागोजागी थांबविलेल्या वाहनातील आजारी बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. रोहित अनिल सोळंके (दोन वर्षे) रा. माथावस्ती कळंब, असे या बालकाचे नाव आहे. एकुलता एक मुलगा दगावल्याच्या धसक्याने आई-वडिलांनाही कळंब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मागील आठ दिवसांपासून रोहितची प्रकृती ठीक नव्हती. शुक्रवारी सकाळी १० वाजता आणखी खराब झाली. रोहितला यवतमाळ येथे रुग्णालयात नेण्यासाठी वसाहतीमधीलच जीवन जवळकर यांची गाडी भाड्याने करण्यात आली. यवतमाळ येथे डॉ. विनायक कुळकर्णी यांच्या रुग्णालयात जाताना ही गाडी यवतमाळ येथे पांढरकवडा बायपासवर पोलिसांनी अडविले. रुग्ण असल्याचे सांगितल्याने गाडी तत्काळ सोडण्यात आली. पुढे शारदा चौकात अडविली. तेथे पोलिसांना गयावया करण्यात आली. येथेही आठ ते दहा मिनिट गेले.तेथून निघाल्यानंतर अवधुतवाडी पोलीस ठाण्याजवळ अडविण्यात आहे. याठिकाणी एक महिला पोलीस कर्मचारी व इतरांनी बरीच विचारपूस केली. एवढेच नाही तर, दवाखान्याचे कागदपत्रही मागितले. या तपासणीत जवळपास दहा मिनिटांचा वेळ गेला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर रोहित मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दहा-पंधरा मिनिटे आधी आणले असते तर, उपचार करता आला असता, असे डॉक्टरांनी म्हणताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला. रोहितचे कलेवर कळंब येथे आणण्यात आले. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी चौकशीत वेळ घालवल्यानेच रोहित दगावल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे.रुग्णांसाठी रस्ता मोकळा असावा - चालककोरोनामुळे सर्वत्र बंदोबस्त आहे. ही गोष्ट आवश्यक असली तरी, रुग्णांना तत्काळ रस्ता मोकळा करुन देणे आवश्यक आहे. आज एका बालकाचा वेळेवर उपचाराअभावी मृत्यू झाला. यापुढे असा प्रकार होऊ नये, अशी प्रतिक्रिया चालक जीवन जऊळकर यांनी दिली. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराचा व्हीडीओ जीवन जऊळकर यांनी समाज माध्यमावर पोस्ट केला.धक्का बसला- धनराज सोळंकेआमच्या घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने मोठा धक्का बसला. वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचिच रोहित वाचला असता. परंतु त्याला उपचार मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो, अशी हताश प्रतिक्रिया रोहितचे काका धनराज सोळंके यांनी दिली.एसीपींनी मागितला अहवालदरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी संबंधित पोलिसांकडून मागितली आहे. कळंबचे ठाणेदार विजय राठोड यांनाही यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.अशी कोणतीही घटना घडली नाही. चालकाने सांगितलेल्या ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आहे. चालकालाही चौकशीसाठी यवतमाळला पाचारण करण्यात आले. त्याची चौकशी केली जात आहे.- प्रदीप शिरस्करपोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस