लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :घुटी रे घुटी आंब्याची घुटीमुख्यमंत्र्यानं देल्ली होकर्जमाफीची जडीबुटीत्या जडीबुटीले आरा ना धुरामुख्यमंत्रीसाहेब,भिक नको हो कुत्रा आवराएक नमन गौरा पार्वतीहर बोला हर हर महादेव...अशा झडत्या पोळ्याच्या पूर्वसंध्येपासूनच सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्या आहेत. पोळ्याच्या झडत्यांच्या निमित्ताने दरवर्षी ग्रामीण माणूस आपले गाऱ्हाणे जगजाहीर करतो. यंदा पोळ्याचीही वाट पाहता शेतकऱ्यांच्या लेकरांनी सोशल मीडियातून तीक्ष्ण झडत्या व्हायरल केल्या आहेत. पोळ्याच्या गर्दीत न जाताही घरबसल्या मनातली खदखद व्यक्त केली जात आहे.काया मातीत टोबतो बियातूर घेणारे आम्हाला घालतात शिव्याशिव्या घालणारे खातेत आमचंचकाय बिघडवलं आम्ही तुमचंघामाचा पैसा मागतो आम्हीथंड हवेत बसता हो तुम्हीघाम गाळून पिकवितो शेतीनादी लागाल तर होईल मातीएक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव...अशा झडत्या हातोहात तयार करून पसरविल्या जात आहेत. मोदी सरकार, देवेंद्र सरकारच्या निर्णयांनी शेतकऱ्यांना बसलेले फटके, या झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यासोबतच पेट्रोलचे वाढते भाव, बोंडअळीची लांबलेली मदत, शेतकऱ्यांच्या न थांबलेल्या आत्महत्या हे विषय टीकाकारांनी झडत्यांतून मांडले आहेत. झडत्यासोबतच पोळ्याचे औचित्य साधून ‘बैल पोळ्याच्या शुभेच्छा’ पाठवून कामचुकारांची मिश्किल फिरकीही घेतली जात आहे. तर कुठे बैलांचा फोटो टाकून ‘आम्ही कसेही जगू, आणखी मेहनत करू, फक्त मालक तुम्ही मरू नका’ असे भावनिक आवाहन करणारे मेसेजही फिरविले.
मुख्यमंत्र्यांनी देल्ली हो कर्जमाफीची जडीबुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:22 IST
मोदी सरकार, देवेंद्र सरकारच्या निर्णयांनी शेतकऱ्यांना बसलेले फटके, या झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यासोबतच पेट्रोलचे वाढते भाव, बोंडअळीची लांबलेली मदत, शेतकऱ्यांच्या न थांबलेल्या आत्महत्या हे विषय टीकाकारांनी झडत्यांतून मांडले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी देल्ली हो कर्जमाफीची जडीबुटी
ठळक मुद्देपोळ्याच्या झडत्यांची सोशल मीडियात धूम : कर्जमाफी, नुकसान भरपाई, महागाई, सरकारवर टीका