शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

मुख्य अभियंता मंडपे रस्त्यांच्या भेटीला

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यवतमाळ जिल्ह्यातील उखडलेल्या रस्त्यांच्या भेटीला येत आहेत. गुरुवारपासून तीन दिवस ते जिल्ह्यात मुक्कामी आहेत.

यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यवतमाळ जिल्ह्यातील उखडलेल्या रस्त्यांच्या भेटीला येत आहेत. गुरुवारपासून तीन दिवस ते जिल्ह्यात मुक्कामी आहेत. या काळात ते यवतमाळ, पुसद, पांढरकवडा या तीनही विभागांचा आढावा घेणार आहेत.पी.एस. मंडपे गुरुवारी पांढरकवड्यात, शुक्रवारी यवतमाळात आणि शनिवारी पुसदमध्ये कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन बांधकाम अभियंत्यांकडून आढावा घेणार आहेत. मंडपे अमरावतीत रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या दीर्घ दौऱ्यावर येत असल्याने बांधकाम खात्याची तीनही विभागातील यंत्रणा कामी लागली आहेत. अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले आहेत. या रस्त्यांच्या कायम व तात्पुरत्या दुरुस्तीचे बजेट शासनाला बांधकाम खात्याने पाठविले आहे. मात्र यावर्षीच्या डागडुजीसाठी पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध झाला नाही. दोन वर्षापूर्वीच्या कामाची थकीत देयके अलिकडेच मिळाली आहे. जिल्ह्यातील राज्य मार्ग, जिल्हा मार्ग व अंतर्गत रस्त्यांची नेमकी अवस्था काय, नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांची कामे खरोखरच गुणवत्तेनुसार झालेली आहेत काय, याची तपासणी मंडपे यांच्या दौऱ्यात होणार आहे. याशिवाय पुलांचीही तपासणी होणार आहे. कारण रेती माफियांमुळे जिल्ह्यातील अनेक मोठ्या पुलांना धोका निर्माण झाला आहे. रेती काढण्याच्या नादात माफियांनी पुलाच्या अगदी पायथ्याशी दहा ते पंधरा फुटांचे खड्डे खोदले आहे. त्यामुळे या पुलांवर औरंगाबाद जिल्ह्यातील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच या पुलांची मुख्य अभियंत्यांकडून पाहणी होणार आहे. याशिवाय नवीन मोठ्या प्रस्तावित कामांचे नियोजन, प्रत्यक्ष भेटी, अवलोकन व आढावा या तीन दिवसीय दौऱ्यात पी.एस. मंडपे घेणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी )