शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

जलयुक्त शिवारच्या कामांची गुणवत्ता तपासा

By admin | Updated: August 5, 2015 00:06 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वच गावांमध्ये कामे होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ज्या गावांमध्ये कामे होऊ शकली नाही,

संजय राठोड : उर्वरित गावांतील कामांचे चांगले नियोजन करा, आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले निर्देशयवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वच गावांमध्ये कामे होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ज्या गावांमध्ये कामे होऊ शकली नाही, त्या गावांमध्ये प्राधान्याने कामे घेण्यासोबतच कामांचे चांगले नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत झालेली कामे व होणाऱ्या कामांचा आढावा घेतला. तसेच समाधान शिबिरा अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह कृषी, जलसंपदा, बांधकाम, लघुसिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, पाणीपुरवठा, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात विविध यंत्रणांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला. आतापर्यंत ३०२ गावांमध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त कामे झाली असल्याचे सांगण्यात आले. काही गावांमध्ये कामे होऊ शकली नाही, अशा गावांसह ३१३ गावांमध्ये करावयाच्या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना केल्या. जलयुक्तमधून झालेल्या कामांची तपासणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून करून घेण्यात येत आहे. त्यानंतर जलसंपदा, बांधकाम, लघूसिंचनच्या अधिकाऱ्यांकडून कामांचे क्रॉस चेकिंग करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. अभियानातून होणारी कामे गुणवत्तापूर्वकच असली पाहिजे. अभियानात जिल्ह्यात चांगले काम व्हावे आणि राज्यभर जिल्ह्यातील कामांचे कौतुक व्हावे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात ४१३ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात अभियानातून कामे घेण्यात येत आहे. या गावांमध्ये जुने एक हजारांवर सिमेंट नाला बंधारे आहे. नवीन बंधारे घेण्यापेक्षा या बंधाऱ्यातील गाळ काढून नाला खोलीकरणाच्या कामास प्राधान्य देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. यावेळी त्यांनी यंत्रणानिहाय कामांची माहिती घेतली. (प्रतिनिधी)समाधान शिबिरातील प्रकरणांचा निपटारायावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी विभागस्तरावर घेतलेल्या समाधान शिबिरातील प्रकरणांचा आढावा घेतला. शिबिरातील प्रकरणे प्रलंबित असल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करा. प्रकरणे निकाली निघणे शक्य नसल्यास तसे संबंधितांना कळविण्याचे निर्देश त्यांनी दिले. आॅगस्टअखेरपर्यंत प्रकरणांवर अंतिम कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सांगितले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना सोडू नकाजिल्ह्यात अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. शासनाची विविध कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे. येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व विभागांच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यास, नवीन अधिकारी येईपर्यंत बदली झालेल्या अधिकाऱ्यांना सोडू नका, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले.