शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ औषधाची सत्यता तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:38 IST

डोळ्याचे विविध आजार व मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करुन येथे कॅम्प भरविला जातो. डोळ्यात औषध टाकण्यासाठी हजारो नागरिक पैसे खर्च करतात. परंतु या औषधांची परिणामकारकता किती आहे, याची कोणालाही माहिती नाही. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शनिवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हा विषय चांगलाच गाजला.

ठळक मुद्देकळंब येथे मोतिबिंदू औषध कॅम्प : जिल्हा परिषद स्थायीत विषय गाजला, चौकशी समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : डोळ्याचे विविध आजार व मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करुन येथे कॅम्प भरविला जातो. डोळ्यात औषध टाकण्यासाठी हजारो नागरिक पैसे खर्च करतात. परंतु या औषधांची परिणामकारकता किती आहे, याची कोणालाही माहिती नाही. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शनिवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हा विषय चांगलाच गाजला.बांधकाम सभापती निमिष मानकर यांनी लोकमतमधील बातमीचा हवाला देत प्रश्न उपस्थित केला. कळंब येथे सुरु असलेला काय प्रकार आहे. औषधोपचार करणाऱ्यांकडे वैद्यकीय पदवी आहे काय. डोळ्यात टाकत असलेल्या औषधांचे प्रमाणिकरणाची नोंद आहे काय. हा कॅम्प नियमानुसार आहे की नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.धर्मेश चव्हाण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितले.कोल्हापूर येथील विनायक गुरव व त्यांच्या सहकाºयांच्या पुढाकारातून कुठलीही माहिती व फलक न लावता हे कॅम्प भरविले जाते. डोळ्यात औषध टाकण्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये घेतले जाते. एका रुग्णाला पाच ते सहा वेळा औषध टाकण्याचे सांगितले जाते. परिणामी एक रुग्ण पाचशे ते सहाशे रुपये खर्च करीत आहे.गुरुवारी धडकणार समितीनेहमीप्रमाणे येत्या गुरुवारी हा कॅम्प लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील एक वैद्यकीय चमू कळंब येथे धडकणार आहे. यावेळी कोण औषधोपचार करतो आणि ते कितपत योग्य आहे. याची माहिती घेतली जाणार आहे.कळंब येथील डोळ्याच्या कॅम्पचा विषय स्थायी समितीत चर्चेत आला. संबंधित यंत्रणेला चौकशी करण्याचे आदेश दिले. होत असलेला प्रकार नियमबाह्य असल्यास कारवाई होईल.- नंदिनी दरणेसभापती, शिक्षण व आरोग्य समिती

टॅग्स :Healthआरोग्य