शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा मान यवतमाळच्या शेतकरी महिलेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 22:45 IST

वैशाली येडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला राज्याभिषेक

- निश्चिलसिंग गौरडोंगरखर्डा (यवतमाळ) : शिवपुत्र शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात यंदा यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला राज्याभिषेकाचा मान देण्यात आला. कळंब तालुक्यातील वैशाली येडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला राज्याभिषेक करण्यात आला. राजांच्या जन्मस्थळी किल्ले पुरंदरवर झालेल्या या सोहळ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपुत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समितीने राज्याभिषेक करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. कळंब) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला वैशाली सुधाकर येडे यांना दिला. राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना रितसर निमंत्रण पत्रिका पाठवून बोलावून घेण्यात आले होते. वैशाली येडे निमंत्रण प्राप्त झाल्यावर आपल्या दोन्ही मुलींसह पुरंदर गडावर हजर झाल्या. गडावरील सोहळ्यात वैशाली येडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराजांना साकडे घातले. यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमींसह मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

साहित्यिक विसरले, महाराष्ट्र नव्हे!२०१९ मध्ये यवतमाळात झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या नावावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर ऐनवेळी वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून सन्मान देण्यात आला. उद्घाटनाच्या भाषणातून वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तडाखेबाज भाषण केले होते. मात्र, साहित्यिकांनी वर्षभरातच त्यांचे नाव अडगळीत टाकले. यंदा उस्मानाबादमध्ये झालेल्या ९३ व्या संमेलनात वैशाली येडे यांना साधे निमंत्रण पाठविण्याचेही औचित्य साहित्यिकांनी दाखविले नाही. मात्र साहित्यिक त्यांना विसरले, तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. म्हणूनच पुरंदर किल्ल्यावर झालेल्या शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना सन्मानपूर्वक अभिषेकाचा मान देण्यात आला, अशी प्रतिक्रिया राजूर गावातून उमटत आहेत.