शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चौथी उत्तीर्ण युवकाने बनविली चार्जिंग सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

संतोष केवळ चौथा वर्ग शिकला. तो रोजमजुरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावतो. त्याने एक जुनी रेंजर सायकल विकत घेतली. चार्जिंगसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या. त्यातूनच त्याने चार्जिंगवरील सायकल विकसित केली. ही सायकल सुरू करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. त्याने तब्बल १५ हजारांचा खर्च केला. ही सायकल पर्यावरणपूरक आहे. मात्र ती तयार करण्यासाठी त्याला ॲॅक्सीलेटर कंट्रोलर किट विकत घ्यावी लागली.

ठळक मुद्देमहागावच्या संतोष कावळे याची भरारी, कमी शिकूनही कल्पकतेचे धुमारे मात्र कायमच

 ज्ञानेश्वर ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : यू-ट्यूबवरील व्हिडीओ बघून येथील इंदिरानगरमध्ये वास्तव्यास असलेला व केवळ चौथी शिकलेल्या संतोष कावळे या युवकाने बॅटरीवर चालणारी सायकल विकसित केली. त्याच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.संतोष केवळ चौथा वर्ग शिकला. तो रोजमजुरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावतो. त्याने एक जुनी रेंजर सायकल विकत घेतली. चार्जिंगसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या. त्यातूनच त्याने चार्जिंगवरील सायकल विकसित केली. ही सायकल सुरू करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. त्याने तब्बल १५ हजारांचा खर्च केला. ही सायकल पर्यावरणपूरक आहे. मात्र ती तयार करण्यासाठी त्याला ॲॅक्सीलेटर कंट्रोलर किट विकत घ्यावी लागली.काही तरी नवीन तांत्रीक बाब शोधून वेगळे करण्याची प्रवृत्ती असलेल्या संतोषने यू-ट्यूबवरुन चार्जिंगवरची सायकल तयार करता येईल का ?, या दिशेने प्रयत्न केले. त्यात तो यशस्वी झाला. त्याचा हा चार्जिंगवर वर चालणाऱ्या सायकलचा प्रयोग बघून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी येथील पंचायत समितीच्या प्रांगणात संतोषचा गौरव करून त्याला प्रशस्तीपत्र दिले. या सायकलीत आणखी सुधारणा करावयाच्या असल्यास आपण मदत करू, अशी ग्वाही देवसरकर यांनी दिली.यावेळी पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे, अशोक जाधव, नगरसेवक राजू राठोड, महेंद्र कावळे, नानासाहेब भवरे, समाधान ठाकरे, संजय पाटे आदी उपस्थित होते.दररोज ४0 किलोमीटरची धावसंतोषने सायकलच्या मागच्या चाकाला मोटर बसवली व त्याचे कनेक्शन कंट्रोलरला दिले. हँडलवर हेडलाईट बसवले. ही सायकल तीन तास चार्ज केल्यानंतर ३0 च्या वेगाने प्रति दिन ४0 किलोमीटर चालते. बॅटरीची चार्जिंग संपल्यास पायडल मारुन सायकल चालविता येते. या सायकलवर मोटारसायकलाचा आनंद घेता येतो.ग्रामीण भागात गुणवत्तासंतोषच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातही गुणवत्तेची कमी नसल्याचे दिसून येते. ग्रामीण विद्यार्थी आणि युवकांमध्ये गुणवत्तेसह कल्पकतासुद्धा ठासून भरली आहे. केवळ त्याला चालना मिळण्याची गरज आहे. अनेक होतकरू तरुण संधीअभावी पुढे जावू शकत नाही. मात्र संतोषने अडचणींवर मात केली.

टॅग्स :Cyclingसायकलिंगtechnologyतंत्रज्ञान