शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:48 IST

नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च करण्यात आला. यामुळे पालिकेची तिजोरी रिकामी झाली असून नवीन क्षेत्रात विकास कामांवर कवडीचाही खर्च न केल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे.

ठळक मुद्देतिजोरी रिकामी : नगरसेवकांनी दिला राजीनाम्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च करण्यात आला. यामुळे पालिकेची तिजोरी रिकामी झाली असून नवीन क्षेत्रात विकास कामांवर कवडीचाही खर्च न केल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे.नगरपरिषद हद्दीत लगतच्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील एक लाख ३६ हजार लोकसंख्या विलीन झाली. या क्षेत्रातील ३६ हजार मालमत्तांचाही यात समावेश आहे. या सर्व मालमत्तांचे आधीच मूल्यांकन झाले होते. तरीही पालिकेने या पुन्हा मूल्यांकन केले. त्यापोटी संबंधित खासगी कंपनीला प्रत्येकी ४७० रूपये देण्यात आले. मात्र मूल्यांकन करताना संबंधित कंपनीने ३६ हजारांऐवजी तब्बल ६३ हजार मालमत्तांचे मूल्यांकन केल्याचा अहवाल दिला.मालमत्तांचे मूल्यांकन करणाºया कंपनीने दुप्पट मालमत्ता दर्शविल्याने पालिकेवर साडे तीन कोटींचा भुर्दंड पडला. यापैकी दोन कोटींचे देयक अदा करण्यात आले. तसेच छायाचित्र अपलोड करण्यासाठी साडेचार लाख, संगणकीकृत माहिती सादर करण्यासाठी साडेचार लाख रूपये द्यावे लागणार आहे. सोबतच प्रशिक्षणावर ४५ हजारांचा खर्च करण्यात आला. बिल वाटपासाठी ८० रूपयांचे देयके आकारले गेले. हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी निविदाच रद्द करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनपालिकेच्या कारभाराविषयी बुधवारी नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. त्यातून त्यांनी निविदा रद्द न झाल्यास येत्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक दिनेश चिंडाले, बबलू देशमुख, विजय खडसे, सपना लंगोटे, वैशाली सवाई, सुषमा राऊत आदी नगरसेवक उपस्थित होते.