शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठांना प्रभार

By admin | Updated: January 12, 2017 00:51 IST

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये ज्येष्ठांना डावलून कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात आला.

 मुख्याध्यापक पद : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, संकेत तुडविले पायदळी यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये ज्येष्ठांना डावलून कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात आला. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र हीच स्थिती दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत तब्बल २१०१ शाळा आहेत. या शाळांमध्ये आठ हजारांच्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत. काही शाळांमध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पदे मंजूर आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदेच नाहीत. अशा शाळांमध्ये तेथे कार्यरत ज्येष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात येतो. बहुतांश शाळांमध्ये हाच संकेत पाळण्यात येतो. मात्र काही शाळांमध्ये कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात आल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते. संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्याशी साटेलोटे करून काही शाळांमधील ज्येष्ठ शिक्षक कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपवित आहेत. कनिष्ठांनी प्रभार घेण्यास असमर्थता दर्शविल्यास त्यांना कारवाईचा इशारा दिला जातो. वास्तविक बीईओंनी कनिष्ठांकडे प्रभार देण्याचा आदेश देणेच संसंगत नाही. तथापि कारवाईचा धाक दाखवित काही पंचायत समित्यांचे बीईओ, विस्तार अधिकारी अधिकाराचा दुरूपयोग करीत कनिष्ठांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार घेण्यास बाध्य करीत असल्याची चर्चा आहे. बीईओ, विस्तार अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे अनेक कनिष्ठ शिक्षक त्रस्त झाले आहेत. त्यांनी ज्येष्ठ शिक्षकांकडेच मुख्याध्यापक पदाचा प्रभार ठेवावा, असे स्पष्ट केले आहे. मात्र उलट त्यांनाच पत्र देऊन प्रभार घेण्यास सांगितले जात आहे. प्रभार न घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती शिक्षकांना सतावत आहे. (शहर प्रतिनिधी)