शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दस्तावेज हरविणाऱ्या कंपनीला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:33 IST

कर्जापोटी गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचे दस्तावेज हरविणाऱ्या दिवाणी हाऊसिंग फायनान्सला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. दस्तावेजाच्या दुय्यम प्रती उपलब्ध करून द्याव्या, सदोष सेवेबद्दल ३० हजार रुपये द्यावे असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य सुहास आळशी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देदिवाणी फायनान्स : जिल्हा ग्राहक न्यायालयाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जापोटी गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचे दस्तावेज हरविणाऱ्या दिवाणी हाऊसिंग फायनान्सला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. दस्तावेजाच्या दुय्यम प्रती उपलब्ध करून द्याव्या, सदोष सेवेबद्दल ३० हजार रुपये द्यावे असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य सुहास आळशी यांनी दिला आहे.येथील राजू रामभाऊ पाटील यांनी दिवाणी हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनकडून घर बांधणीसाठी कर्ज घेतले. त्यासाठी आवश्यक ते सर्व दस्तावेज या कंपनीला सुपुर्द करण्यात आले. घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर राजू पाटील यांनी या कंपनीकडे मालमत्तेच्या दस्तावेजाची मागणी केली. त्यावेळी कंपनीकडून टाळाटाळ सुरू झाली. दस्तावेज सापडल्यानंतर परत केले जाईल, असे त्यांना सांगितले गेले.दिवाणी हाऊसिंग फायनान्सकडून अडवणूक होत असल्याने पाटील यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात धाव घेतली. या प्रकरणात मंचाने दोनही बाजूंचा युक्तिवाद जाणून घेतला. यात कंपनीने पाटील यांना सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट झाले. जबाबदारी पार पाडण्यात कंपनी अपयशी ठरल्याचे मंचाने निकालात म्हटले आहे.फायनान्स कंपनीने संपूर्ण दस्तांच्या दुय्यम प्रती संबंधित कार्यालयातून काढून द्याव्या, सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाईपोटी ३० हजार रुपये द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार आणि तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये देण्यात यावे, असा आदेश दिला आहे. या निर्णयाने दिवाणी फायनान्सला चपराक बसली आहे.कंपनीने दिली कबुलीराजू पाटील यांचे दस्त शोधूनही सापडले नाही. त्यामुळे परत करण्यास असमर्थ आहे, अशी कबुली कंपनीने दिली. दस्तावेज सांभाळून ठेवणे आणि कर्ज नील झाल्यावर परत करणे, हे कर्तव्य आहे. मात्र दिवाणी फायनान्स कंपनीचा बेजबाबदारपणा या प्रकरणात उघड झाला.