शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

‘वसंत’च्या निवडणुकीने बदलविली समीकरणे

By admin | Updated: January 23, 2017 01:07 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि सात हजार ४४९ मतदार असलेल्या येथील वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या

दोन गटांत थेट लढतीचे संकेत : राळेगाव तालुक्यात दोन निवडणुकांची रणधुमाळी राळेगाव : तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि सात हजार ४४९ मतदार असलेल्या येथील वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या १९ फेब्रुवारी रोजी होवू घातलेल्या निवडणुकीने १६ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सर्वच राजकीय समिकरणे बदलून टाकली आहे. राळेगाव शहर वगळता ७१ हजार १७९ मतदार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे, तर राळेगाव सोडून सात हजार वसंत जिनिंगचे भागधारक मतदार दोन्हीकडे सारखेच असल्याने प्रत्येक भागधारक मतदाराच्या घरात पाच-दहा मते असल्याने जिनिंगचा उमेदवार, नेता, पक्ष, गटाची, मतदाराची चॉईस जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर प्रभाव टाकू शकते. तर जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार त्यांचे नेते, पक्ष, गट याची मतदारांची चॉईस वसंत जिनिंग निवडणुकीवर प्रभाव टाकू शकणार आहे. ‘वसंत’साठी उमेदवारी अर्ज भरण्यास २४ जानेवारीपर्यंत मुदत आहे. सहकार क्षेत्रात सोसायट्या, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर गटाच्या ताब्यात आहे. वसंत जिनिंगचे मावळते अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे मानकर गटाचे, तर उपाध्यक्ष अरविंद वाढोणकर हे माजी आमदार प्रा. वसंत पुरके गटाचे आहेत. गतवेळी झालेल्या निवडणुकीत मानकर व पुरके गटाची युती होती. त्यामुळे जिनिंगवर दोन्ही गटाचे संचालक निवडून आले होते. यावेळी मानकर गट व पुरके गटात युतीबाबत अद्याप तरी भूमिका स्पष्ट झालेली नाही. विविध सोसायट्या, बाजार समितीची निवडणूक या दोन्ही गटांनी आमनेसामने संपूर्ण शक्तीनिशी लढली. तत्पूर्वीच्या निवडणुकीत दगाफटका झाल्याच्या आरोपावरून नेते व कार्यकर्त्यांमध्ये आलेल्या वितुष्टावरून वसंत जिनिंगची निवडणूकही या दोन्ही गटात सरळ लढत होईल, असे संकेत दिसत आहे. मानकर नेहमी मी काँग्रेसचाच ही बाब जोर देवून सांगत असताना काँग्रेसच्याच दोन्ही गटात ही निवडणूक झाली, तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्याचा फार मोठा प्रभाव निश्चित पडणार असे स्पष्ट होत आहे. सहकार क्षेत्रात इतर पक्षांचा फारसा प्रभाव नसल्याने सहकारातील या निवडणुकीतील मतदारांचा कौल मिळविणे आव्हानात्मक ठरणार आहे. जिल्हा परिषद-पंचायत समितीची निवडणूक प्रथम म्हणजे १६ फेब्रुवारीला होणार आहे. जिनिंग निवडणुकीतील तयारीचा फायदा ती निवडणूक लढविणाऱ्या पक्ष, गट, नेत्याला अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जिनिंगची निवडणूक १९ फेब्रुवारीला होणार असल्याने त्याकरिता पक्ष, गट, उमेदवारांची शक्ती पुढील दोन दिवसात एकवटता व अजमावता येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)