शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मारक कायदे बदला!

By admin | Updated: March 20, 2017 00:18 IST

कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांची व्याख्या जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.

अमर हबीब : महागावच्या अन्नत्याग आंदोलनात राज्यातील मान्यवरांची उपस्थिती महागाव : कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांची व्याख्या जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. ८७ टक्के शेतकरी आत्महत्या या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आहेत. सिलिंगचा कायदा, जीवनावश्यक वस्तूंचा कायदा हे शेतकऱ्यांना अधोगतीकडे नेणारे आहेत. असे कायदे संपुष्टात आणा, अशी मागणी अन्नत्याग आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केली. चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली. महाराष्ट्रातील या पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३१ वर्षे झाली तरी शासनाची धोरणे बदललेली नाही. त्यामुळे रविवारी महागावातून राज्यव्यापी अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले. याप्रसंगी अमर हबीब बोलत होते. महागाव बसस्थानकासमोर झालेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे होते. खासदार राजू शेट्टी, आमदार आशीष देशमुख, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार ख्वाजा बेग यांच्यासह राज्यभरातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदविला. चंद्रकांत वानखडे म्हणाले, शासन प्रत्येक गोष्टीची हमी मागते. ऐंशीच्या दशकात पेटून उठणारा शेतकरी आज आंदोलनात सहभागी होत नाही, यावर आपण आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. एखादी जखम भरायची झाली तरी त्याला कापसाची गरज पडते. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकरी एकसंघ नाही. त्याचा फायदा शासनकर्ते घेत आहेत. खासदार राजू शेट्टी म्हणाले, जे शेतीतून बाहेर पडले त्यांनीही अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले पाहिजे. स्वामिनाथन आयोगाचे विधेयक मंजुरीसाठी टाकताना सर्वच हो म्हणाले. प्रत्यक्षात मी एकटाच राहिलो. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार विजय खडसे यांनीही विचार मांडले. खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी संवेदना संदेश पाठविला. चंद्रकांत वानखडे यांनी अमर हबीब यांना लिंबू शरबत देऊन सांगता केली. या आंदोलनात डॉ. विश्वनाथ विनकरे, देवेंद्र भुयार, सुरेश रोहणेकर, शरद पाटील, जगदीश नरवाडे, नगराध्यक्ष सुनिल नरवाडे, उदय नरवाडे, प्रा. विलास भवरे, योगेश वाजपेयी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊराव चौधरी, संदीप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर, संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर, कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र कावळे, विशाल पांडे, अशोक तुमवार, अ‍ॅड. विवेक देशमुख, मनीष जाधव, विनोद पाटील, गोपाल चव्हाण, सतीश चव्हाण, प्रशांत ठाकरे, प्रदीप पाटील, मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मिथून अलाटे, गौरव नाईकर, सुधाकर जाधव, पुरुषोत्तम राठोड, नगरसेवक नारायण शिरबिरे, रामचंद्र तंबाखे व असंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)