शहरं
Join us  
Trending Stories
1
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
2
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
3
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
4
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
5
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
6
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
7
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
8
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
9
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
10
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
11
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
12
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
13
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
14
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
15
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
16
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
18
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
19
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
20
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोपालपूर रोपवाटिकेत चंदन तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:19 IST

पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली.

ठळक मुद्देपाच मोठी झाडे लंपास : अन्य झाडांवरही तस्करांनी फिरविली आरी, वन अधिकारी अनभिज्ञ

बंडू कर्णेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली. या तस्करांनी चंदनाच्या इतरही पाच ते सहा झाडांना आरीने कापून नेण्याचा प्रयत्न केला.पाच ते सहा चंदनाच्या झाडांवर आरीच्या खुणा स्पष्ट दिसून येत असून चोरून नेलेल्या चंदनाच्या झाडांचे बुंदे घटनास्थळावर दिसत आहेत. पाच चंदनाच्या झाडांवर चोरट्यांनी हात साफ केले आणि फांद्या मात्र तेथेच फेकून देऊन पोबारा केला. लाखो रुपयांची मालमत्ता चोरीला जाऊनही याचा थांगपत्ता वनपरिक्षेत्र पांढरकवडाअंतर्गत कार्यरत वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू नये, यात चंदन तस्कर व वनअधिकारी यांची मिलीभगत तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कत्तल करण्यात आलेल्या चंदनाच्या झाडांची घटनास्थळी जाऊन चौकशी केल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.पाच झाडांची चोरी पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली असून तस्करांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे ठाकले आहे. गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिका येथून सात किलोमीटर अंतरावर असून पांढरकवडा-शिबला मार्गावर दोन्ही बाजुला ९.९७ हेक्टर वनपरिक्षेत्रात विस्तारलेली आहे. सर्व्हे नंबर १०१ मध्ये ई-वर्ग जमीन आहे. सदर रोपवाटिकेत विविध रोपांची लागवड करून तेथे रोपटी तयार केली जातात. या रोपवाटीकेत इतरही अनेक प्रकारची मोठमोठी झाडे असून यात चंदनाचीसुद्धा झाडे आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण रोपवटीकेला तारेचे कंपाऊंड व मुख्य प्रवेशद्वार आहे. रोपवाटीकेतून चंदनाची झाडे चोरी गेल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने खात्री करण्यासाठी सदर रोपवाटिकेत फेरफटका मारला असता, तेथे केवळ एक रोजंदारी कर्मचारी दिसला. वनविभागाचा एकही कर्मचारी वा अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. एवढी मोठी चोरी होऊनही वन कर्मचारी व अधिकारी याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. वनविभागाने एवढी मोठी रोपवाटिका वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते. याचाच फायदा तस्करांनी घेतला. सात ते आठ दिवसांपूर्वी तस्करांनी या रोपवाटिकेत शिरून चंदनाची झाडे लंपास केली. दुसऱ्या दिवशी घटनेची माहिती मिळताच, येथील वन कर्मचाऱ्यांनी प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून झाडांच्या फांद्या गोळा करून रोपवाटिकेत ठेवल्या. वनविभागाच्या वतुर्ळात दबक्या आवाजात चंदन तस्कर व गोपालपूर रोपवाटिकेतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने या झाडांची विल्हेवाट लावण्यात आल्याची चर्चा आहे. यवतमाळच्या वनसंरक्षकांनी याची दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करून संधीसाधू दोषी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी आहे.वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठी वाढपांढरकवडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगलांमध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी चितळाची शिकार करण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. मात्र अशा अनेक शिकारी दडपल्या जात असल्याची चर्चा परिसरात आहे. मोर, हरिण, ससे आदी प्राणी शिकाऱ्यांच्या रडारवर आहे. या वन्यजीवांच्या मांसाची खवय्यांककडून चांगलीच मागणी असते. त्यामुळे या प्राण्यांच्या शिकारी केल्या जात आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभागThiefचोर