शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरी रोखण्याचे आव्हान

By admin | Updated: February 9, 2017 00:26 IST

शहरासह ग्रामीण भागातील वीज चोरी रोखण्याचे तगडे आव्हान विद्युत कंपनीसमोर आहे.

विद्युत कंपनी : आकोडे टाकून वीज पुरवठा, पथकाच्या कामगिरीवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह यवतमाळ : शहरासह ग्रामीण भागातील वीज चोरी रोखण्याचे तगडे आव्हान विद्युत कंपनीसमोर आहे. घरगुती वापरासह विविध कामांसाठी आकोडे टाकून वीज चोरी केली जात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे सर्व प्रयोग सपशेल अयशस्वी ठरले असल्याचे दिसून येत आहे. यात प्रामाणिक वीज ग्राहकांचे मात्र नुकसान होत आहे. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून व्यवसाय सुरू करणाऱ्यांसह झोपडीवजा घरात उजेड पडावा यासाठी चोरीची वीज वापरली जात आहे. सहज दृष्टीस पडेल अशा प्रकारे आकोडे टाकून वीज घेण्यात आलेली आहे. अपघाताची कुठलीही भीती अथवा विद्युत कंपनीकडून कारवाई होईल याची थोडीही चिंता न करता वीज चोरी होत आहे. एकीकडे नागरिकांना अनियमित वीज पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते, तर दुसरीकडे वीज चोरी सुरू आहे. वीज चोरी रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पथकाला यश कसे येत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात सहज फेरफटका मारला तरी वीज चोरी सापडू शकते. शिवाय शहरी भागात गल्लीबोळांमध्ये सुरू असलेली चोरीही उघड होते. परंतु यासाठी चांगले प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. वीज देयक नियमित भरणाऱ्या ग्राहकांकडे थोडीही रक्कम थकीत झाल्यास वीज पुरवठा तोडण्याची कारवाई केली जाते, मग वीज चोरी का पकडली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्युत कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर) उघड्या डीपी धोकादायक शहर आणि ग्रामीण भागातील उघड्या डीपी धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी तर डीपीला दरवाजाच नसल्याचे प्रकार आहे. वीज दुरुस्त केल्यानंतर डीपीचा दरवाजा चांगल्या प्रकारे लावण्याची तसदी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही. कडीकोंडे असतानाही ते पक्के लावले गेले की नाही, याची खात्री करत नाही. काही डीपी रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. एखाद्यावेळी चुकून डीपीमधील साहित्याला स्पर्श झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती आहे.