शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

काँग्रेसपुढे मते कायम राखण्याचे आव्हान

By admin | Updated: November 18, 2016 02:31 IST

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेवटच्या घटकेपर्यंत काँग्रेसला पक्षीय मते कायम राखण्याचे आव्हान राहणार आहे.

विधान परिषद : पक्षांतर्गत गटबाजीचा धोकायवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेवटच्या घटकेपर्यंत काँग्रेसला पक्षीय मते कायम राखण्याचे आव्हान राहणार आहे. पक्षांतर्गत गटबाजीतून ऐनवेळी दगा फटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत काँग्रेसकडून कोणती रणनीती आखली जाते, हे निर्णायक ठरणारे आहे.काँग्रेसचे शंकर बडे हे माजी मंत्री शिवाजीराव मोघे पुरस्कृत उमेदवार म्हणून चर्चिले जात आहे. पक्षातील इतर नेते मंडळी या शेवटच्या दोन दिवसांत त्यांच्यासाठी कितपत प्रयत्न करतात, यावर निवडणूक अवलंबून आहे. आजतागायत काँग्रेसमध्ये नेत्यांत असलेली अंतर्गत धुसफूस विरोधकांच्या कायम पथ्यावर पडत आली आहे. त्यामुळेच काँग्रेसकडे असलेली १५४ मते कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजपाने प्रा. तानाजी सावंत यांच्यासारखा सक्षम उमेदवार देऊन मोठे आव्हान उभे केले आहे. सावंत यांनी आपल्या कार्यशैलीची छाप मराठवाड्यात सोडली आहे. सहकार, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यामुळे सावंत यांची दावेदारी काँग्रेससाठी तगडे आव्हान देणारी आहे. यातच संभाव्य पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजपाकडून गृहराज्य मंत्री रणजित पाटील मैदानात उतरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजपा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेसोबत आहे. इतकेच नव्हेतर, भाजपाचे राज्यमंत्री मदन येरावार, पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे युतीकडूनही तानाजींच्या विजयासाठी जोरकस प्रयत्न केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)