शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रेती माफियांचे प्रशासनाला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 21:58 IST

तालुक्यात गेल्या काही वर्षांत अनेक रेती माफीया सक्रिय झाले. प्रशासन कठोर कारवाई करीत नसल्याने त्यातील अनेक मुजोर झाले. या माफियांचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देतस्कर मुजोर : महसूल विभाग हतबल, नदीपात्रात खोदकाम

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात गेल्या काही वर्षांत अनेक रेती माफीया सक्रिय झाले. प्रशासन कठोर कारवाई करीत नसल्याने त्यातील अनेक मुजोर झाले. या माफियांचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.राळेगाव तालुक्यात १५ रेती घाट आहे. यावर्षी त्यातील एकाही घाटाचा अद्याप लिलाव झाला नाही. त्यामुळे रेती चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. शासकीय संपत्तीची खुले आम लूट सुरू आहे. इतर तालुक्यात वेळोवेळी कठोर कारवाई झाल्या. त्या तुलनेत तालुक्यात मवाळ कारवाई झाल्या. त्यामुळे या माफियांची हिम्मत वाढली आहे. गतवर्षी सात रेती घाटांतून शासनाला रॉयल्टीपोटी पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय वेळोवेळी केलेल्या कारवाईतून दीड-दोन कोटी रुपयांचा दंड प्राप्त झाला.या भागात रेती घाट लिलावात घेऊन वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील घाटातून रेती उपसा करण्याच्या प्र्रकरणात तेथील महसूल विभागाने लाखो रुपये दंड ठोठावला होता. एका रेती घाटाच्या ठिकाणी पोकलॅडवरथेट गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातच खळबळ उडाली होती. रेती तस्करीतून मालामाल झालेल्यांनी स्वत:चे मजबूत नेटवर्क उभारले आहे. रेती तस्करी प्रकरणात पाच पट दंड ठोठावण्यावर कारवाई मर्यादित स्वरुपाच्या राहिल्या. काही मोजके अपवाद वगळता वाहन जप्ती, पोलीस ठाण्यात गुन्हे, आरटीओकडे प्रकरणे कारवाईसाठी देणे आदी कठोर उपाय टाळण्यात आल्याने रेती तस्कर निर्धास्त आहे.रेती चोरट्यांकडून महसूल विभाग दंड वसुलीनंतर जप्तीतील वाहन परत करताना वैयक्तीक जात मुचलका (बाँड) लिहून घेत राहिले. हेच चोरटे वारंवार महसूल विभागास रेती चोरताना आढळून आल्यावर वैयक्तीक जात मुचलक्यातील अटी भंगप्रकरणी कारवाई झाली नाही. महसूल विभागाच्या दंडाच्या व शिक्षेच्या नोंदवहीत वाहन क्रमांकच लिहिले जात नसल्याने चोरट्यांचे फावत राहिले. अनेक ठिकाणचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या कुटुंबातील सदस्य रेती तस्करीत गुंतले आहे. त्यांच्यावर अपात्रतेसारखी कठोर कारवाई होण्याची गरज आहे.रेकॉर्डवरील चोरट्यांची नावे समोर आणारेती घाट एकदाही लिलावात घेतला नसताना विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रकद्वारे दिवस-रात्र रेती चोरीच्या भरवशावर तस्करांनी माया गोळा केली. नवीन ट्रॅक्टर, ट्रक, जंबो ट्रक, जेसीबी, पोकलॅड, आलिशान आरामदायी वाहने घेतली. वेळोवेळी या तस्करांची वाहने पकडली गेली. त्यांच्यावर कारवाईही झाली. अशांची नावे महसूल विभागाने समोर आणून किमान याच चेहऱ्यावर लक्ष केंद्रीत केले, तर तस्करीला आळा बसू शकतो.

टॅग्स :sandवाळू