शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पाटणबोरी येथे चक्काजाम

By admin | Updated: May 6, 2016 02:24 IST

गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या संतप्त पिंपळखुटीवासीयांनी गुरूवारी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.

महावितरणविरूद्ध रोष : पिंपळखुटीवासीय धडकले कार्यालयावरपाटणबोरी : गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या संतप्त पिंपळखुटीवासीयांनी गुरूवारी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. दुचाकी रस्त्यावर आडवी लावून ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन केले.गेल्या दोन महिन्यापासून तेलंगणा सेमेवरील पिंपळखुटी येथील नागरिक महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मेटाकुटीस आले आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर अनेकदा समस्या मांडल्या. मात्र ग्राहकांच्या समस्यांचे कोणतेही देणेघेणे नसलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. शेवटी त्रस्त झालेल्या ५० ग्रामस्थांनी गुरूवारी येथील महावितरण कार्यालयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दुचाकींना रस्त्यावर आडवी लावून पाटणबोरी मुख्य रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले. यानंतर ग्रामस्थांनी महावितरणच्या भटकर व राठोड या कर्मचाऱ्यांना घेराव घातला. सकाळी ११ वाजतापर्यंत येथील कनिष्ठ अभियंता वैशाली बुरांडे आल्या नव्हत्या. त्यांच्याशी संपर्क साधला असता, साहित्याबाबतची गरज वरिष्ठांना कळविली असून अद्याप साहित्य आले नाही. त्यात आमची काय चूक आहे, असे त्यांनी सांगितले.पिंपळखुटी येथे महावितरणचा भोंगळ कारभार असून विजेचे तार अनेकांच्या घरावर पडले आहे. तेथील डीपीचे कोणतीही देखभाल होत नसून डीपी उघड्या अवस्थेत आहे. उच्च-कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नऊ जणांचे दूरचित्रवाणी संच, १६ कुलर व चार फ्रिज आत्तापर्यंत जळाले आहे. विजेच्या समस्येने नागरिक वैतागून गेल्याने त्यांनी महावितरणवर धडक दिली. या आंदोलनात गजानन पुल्लेवार, लसमन्ना कोरेड्डीवार, आशन्ना पुंड्रावार, प्रमोद रासमवार, महेंद्र रासमवार, अशोक रासमवार, गोपाल कोरेड्डीवार आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)