शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लुटारूंचा दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला, दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:10 IST

वाटमारी करणा-या लुटारूंनी दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना केळापूर टोल नाक्यावर गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी सापळा लावला होता. पोलिसांनी जीवाची बाजी लावत जळगाव जिल्ह्यातील दोन लुटारूंना अटक केली. 

यवतमाळ : वाटमारी करणा-या लुटारूंनी दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना केळापूर टोल नाक्यावर गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी सापळा लावला होता. पोलिसांनी जीवाची बाजी लावत जळगाव जिल्ह्यातील दोन लुटारूंना अटक केली. पांढरकवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद पिदूरकर आणि पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे असे जखमी पोलीस अधिका-यांची नावे आहेत. नागपूर-हैदाराबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एका ट्रक चालकाला चाकूच्या धाकावर लुटण्यात आले होते. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी या परिसरात दोन दिवसांपासून सापळा रचला होता. गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास केळापूर नाक्याजवळ काही अनोळखी इसम ट्रकजवळ आले. तेवढ्यात सापळा रचलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनी धाव घेतली. त्यावेळी या लुटारूंनी त्यांच्यावर प्रचंड दगडफेक केली. याही परिस्थितीत पोलिसांनी लुटारूंना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीएसआय मंगेश भोंगाडे यांच्यावर लुटारूंनी चाकूहल्ला केला. तर दगडफेकीत एपीआय आनंद पिदूरकर जखमी झाले. या झटापटीतही पोलिसांनी लुटारू दिलीप पवार (१९) आणि शामपाल रामला पवार (२१) दोघे रा. मादापुरी ता. मुक्ताईनगर जि. जळगाव यांना अटक केली. तर दोन आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. या आरोपींवर जळगाव जिल्ह्यात खून, दरोडा असे गंभीर गुन्हे आहेत. रुद्राक्ष व स्फटीकाच्या माळा विकण्याचा व्यवसाय करून रात्री वाटमारी करीत असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrimeगुन्हा