शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बुढीचा चिवडा; चवदार चिवड्यातून यवतमाळचा जागतिक लौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:35 PM

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या ‘चिवड्याचा ब्रँड’ जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या अंजनाबाई भुजाडे यांच्या कर्तृत्वाला जागतिक महिला दिनीच उजाळा देण्याचा हा प्रयत्न... ते वर्ष होते १९४६. ब्रिटिश राजवटीचा काळ. आलेगावचे (ता. बाभूळगाव) माहेर सोडून यवतमाळच्या भुजाडे परिवारात सासरी आलेली अंजनाबाई गरिबीशी दोन हात करू लागली. महिलांनी घराबाहेर पडू नये, डोईवरचा पदर ...

ठळक मुद्देब्रिटिश काळात निरक्षर अंजनाबाई बनली यशस्वी व्यावसायिकनागपूरचे सावजी मटण, शेगावची कचोरी... तसा यवतमाळात ‘बुढीचा चिवडा’ फेमस! या खमंग चिवड्यासाठी अमेरिका, आॅस्ट्रेलियापर्यंत यवतमाळची खास ओळख निर्माण झाली आहे. कोणी केली ही कमाल? ही कमाल करणारा कोणी माई का लाल नव्हे खुद्द माईच आहे! या माईचा चिवडा आता सातासमुद्र

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या ‘चिवड्याचा ब्रँड’ जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या अंजनाबाई भुजाडे यांच्या कर्तृत्वाला जागतिक महिला दिनीच उजाळा देण्याचा हा प्रयत्न... ते वर्ष होते १९४६. ब्रिटिश राजवटीचा काळ. आलेगावचे (ता. बाभूळगाव) माहेर सोडून यवतमाळच्या भुजाडे परिवारात सासरी आलेली अंजनाबाई गरिबीशी दोन हात करू लागली. महिलांनी घराबाहेर पडू नये, डोईवरचा पदर ढळू नये, खालची मान वर करू नये... त्या काळात महिलांवर अशा बंधनांचे साखळदंडच होते. त्यातल्या त्यात आझाद मैदान म्हणजे जंगलव्याप्त परिसर. तेथे अंजनाबाई चिवड्याची हातगाडी लावून बसायची. केवळ १० पैशात चिवडा विकून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. प्रतिकूल परिस्थितीत ती स्वतंत्र व्यावसायिक बनली अन् यशस्वीही झाली.काळ बदलला पण अंजनाबाईच्या चिवड्याची चव कमी झाली नाही. यवतमाळकरांनी आत्यंतिक आपलेपणाच्या भावनेतून या चिवड्याला ‘बुढीचा चिवडा’ म्हणून लौकिक प्रदान केला. बुढी या शब्दामागे यवतमाळच्या माणसाला ‘माय’ हा अर्थही अभिप्रेत असतो. आज ७२ वर्षांच्या कालखंडानंतर हा चिवडा यवतमाळच्या खाद्यसंस्कृतीचा ‘ब्रँड’ बनला आहे. लग्न समारंभ, वाढदिव अशा प्रसंगात या चिवड्याला खास ‘आॅर्डर’ असते. बँक, शाळा, पोस्ट आॅफिस, जिल्हा परिषद, नगरपरिषद अशा कोणत्यातरी कार्यालयातून रोज ‘बुढीच्या चिवड्या’चे पार्सल हमखास मागविले जातेच. दररोज ३० पायल्या म्हणजे जवळपास ३५ किलो ‘बुढीच्या चिवड्या’ची उलाढाल होते.१९७७ मध्ये अंजनाबार्इंचा मृत्यू झाला. पण तिने यवतमाळला दिलेला चिवड्याचा ब्रँड आजही जगभरात जातोय. अंजनाबाईनंतर त्यांचा मुलगा श्रावण, त्यानंतर आता नातू अशोक ‘बुढीचा चिवडा’ विकतात. जेव्हा अंजनाबाईने आझाद मैदानात दुकान लावले, तेव्हा तेथे जंगल होते. आज ते मैदान जणू यवतमाळची चौपाटी बनली आहे. बुढी गेली पण बुढीचा चिवडा आज अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करतोय...

अमेरिका, दुबईतही पोहचला चिवडायवतमाळातील अनेकांचे नातेवाईक अमेरिका, दुबई, आॅस्ट्रेलिया, गोवा, कर्नाटक, गुजरात अशा विविध ठिकाणी आहेत. ते यवतमाळात आले की पार्सलच्या पार्सल भरून ‘बुढीचा चिवडा’ घेऊन जातात. अनेकदा तर फोन करून खास पार्सल मागवून घेतात, असे अंजनाबाईचे नातू अशोक भुजाडे सांगतात.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस