शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

सिझरिनच्या महिला रुग्ण, बाळांवर चक्क जमिनीवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 18:19 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती वॉर्डात सिझरिन झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत.

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती वॉर्डात सिझरिन झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. वैद्यकीय महाविद्यालयात क्र.७ व ८ हा प्रसूती वॉर्ड आहे. तेथे महिलांची प्रचंड गर्दी आहे. उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक झाल्याने जागेअभावी दोन खाटांच्या मधल्याभागी गाद्या टाकून सिझरिनच्या महिलांवर उपचार केले जात आहेत.नवजात बाळांनाही तेथेच खाली जमिनीवर बेडवर ठेवले जात आहे. या बाळांच्या बेडच्या आजूबाजूला मुंग्या, माकोडे फिरत असल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी दुपारी संकल्प फाऊंडेशनचे सदस्य आकाश भारती यांच्या निदर्शनास आला. त्यांच्याकडून माहिती मिळताच फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, रवी माहुरकर, मनिष इसाळकर, विनोद नराळे, गोलू डेरे हे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. बाजूचा वॉर्ड क्र.६ रिकामा असताना महिला रुग्णांना तेथे का हलविले जात नाही या मुद्यावर त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांना जाब विचारला. त्यानंतर डॉ. श्रीगिरिवार यांनी विभाग प्रमुख चव्हाण यांना सूचना दिल्या व वॉर्ड क्र.७, ८ मधील जमिनीवर उपचार सुरू असलेल्या महिला रुग्णांना वॉर्ड क्र.६ मध्ये हलविण्यास सांगितले. तेथेही बेड कमी पडल्यास वेळप्रसंगी एका बेडवर दोन रुग्ण ठेवावे, मात्र महिला व बाळांवर जमिनीवर ठेवून उपचार करू नये, अशा सूचना अधिष्ठातांनी दिल्या. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. लगतच्या वाशीम, नांदेड, माहूर, आदिलाबाद, अमरावती या जिल्ह्यातून रुग्णांची मोठी गर्दी होते. त्यातील किमान १०० रुग्ण रोज उपचारार्थ दाखल होतात. महाविद्यालयाची क्षमता लक्षात घेता येथे खाटांची संख्या नेहमीच कमी पडते. पावसाळ्यामध्ये सहसा साथीच्या आजाराच्या रुग्णांची प्रचंड गर्दी होत असल्याने अनेकदा एका बेडवर दोन रुग्ण किंवा जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर येते. परंतु आता नवजात बाळांवरही जमिनीवर उपचार केले जात असल्याने रुग्णाचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.