शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार शाळांच्या मूल्यवर्धन संकल्पपूर्तीचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 15:24 IST

शांतीलाल मुथा फाऊंडेशनने विकसित केलेला मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राज्यशासन शाळांमध्ये राबवित आहे. आता या मूल्यवर्धनाच्या संकल्पपूर्तीचा अनोखा सोहळा पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये विद्या प्राधिकरणाने आयोजित केला आहे.

ठळक मुद्देशांतीलाल मुथा फाऊंडेशनचा पुढाकारविद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शांतीलाल मुथा फाऊंडेशनने विकसित केलेला मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राज्यशासन शाळांमध्ये राबवित आहे. आता या मूल्यवर्धनाच्या संकल्पपूर्तीचा अनोखा सोहळा पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये विद्या प्राधिकरणाने आयोजित केला आहे. राज्यभरातील शाळांच्या या प्रदर्शनाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांसह १० हजार प्रेक्षक भेट देणार आहे.येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा सोहळा होणार आहे. शांतीलाल मुथा फाऊंडेशनने विकसित केलेला मूल्यवर्धन कार्यक्रम गेल्या चार वर्षापासून शाळांनी यशस्वी करून दाखविला. २१५ तालुक्यातील ४० हजार शाळांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे. उर्वरित शाळांमध्येही येत्या तीन महिन्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यानिमित्त होत असलेल्या प्रदर्शनात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विशेष स्टॉल राखून ठेवण्यात आला आहे. या स्टॉलमध्ये जिल्ह्यातून निवडलेल्या उत्कृष्ठ पोस्टर्सचे प्रदर्शन भरविले जाणार आहे.विशेष म्हणजे हा स्टॉल फक्त मराठी शाळांसाठीच राखीव असेल. तर उर्दू, इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या शाळांचेही स्वतंत्र दालन राहणार आहे.यासंदर्भात विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड यांनी शिक्षणाधिकाऱ्यांंना पत्र पाठवून सर्व शाळांना सहभागी करण्याबाबत सूचना दिली आहे. पोस्टर्ससाठी जवळपास ३२ विषय देखील सूचविले आहे. या प्रदर्शनातील पोस्टर्सचा भविष्यकाळातील पाठ्यपुस्तकांसाठी उपयोग होण्याची शक्यता आहे. शिवाय या समारोहाच्या निमित्ताने ‘मी आणि मूल्यवर्धन’ हे पुस्तकही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित केले जाणार आहे. त्यात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांचे मूल्यवर्धनाशी संबंधित अनुभव मांडले जाणार आहे. या पुस्तकासाठी अनुभव लिहून पाठविण्याचे आवाहन विद्या प्राधिकरण आणि शांतीलाल मुथा फाऊंडेशनने केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा