शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी चौकशी समितीचा अहवाल फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:10 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे १३ वने निधीतून संगणक संच खरेदीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल सीईओंनी फेटाळला आहे. आता त्यांनी फेरचौकशी समिती नेमूनर् ५ दिवसात अहवाल मागितला आहे.

ठळक मुद्दे१३ वनेमधील संगणकप्रकरण : सखोल चौकशीसाठी तीन सदस्यीय फेरसमिती नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे १३ वने निधीतून संगणक संच खरेदीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल सीईओंनी फेटाळला आहे. आता त्यांनी फेरचौकशी समिती नेमूनर् ५ दिवसात अहवाल मागितला आहे.समाजकल्याण विभागातर्फे १३ वनेच्या निधीतून जिल्ह्यातील काही शाळांसाठी डिजीटल साहित्य खरेदीचा प्रस्ताव होता. प्रस्ताव मंजूर होताच जवळपास २६ शाळांमध्ये २८ संगणक संच पुरविण्यात आले. मात्र त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविली गेली नाही. यावरून स्थायी व सर्वसाधारण सभेत गदारोळ उडाल्यानंतर उपाध्यक्षांनी सदर संच एका सामाजिक संस्थेने दिल्याचा दावा केला होता. अशा सामाजिक संस्थेचा सत्कार करावा अशी भूमिका विरोधकांनी मांडली होती. त्यानंतरच्या सभेत पुन्हा वादंग झाल्याने लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमण्यात आली. या समितीने सीईओंना आपला अहवाल सादर केला.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी डिजीटल साहित्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल फेटाळून लावला आहे. त्यांच्या अहवालाला असहमती दर्शवून शर्मा यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याकरिता तीन अधिकाऱ्यांची फेरचौकशी गठित केली आहे.या समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी विजय देशमुख, पंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील वनकर यांचा समावेश आहे. या समितीला १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहे.वंटन आदेशाचे काय?गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत उपाध्यक्षांनी साहित्य खरेदी प्रकरणी वंटन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता सीईओंनी फेरचौकशी नेमल्याने या वंटन आदेशाचे नेमके काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता साहित्य खरेदी झाले असल्याने त्याचे वंटन आता कसे काय करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद