शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा केंद्र सरकारचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 07:00 IST

केंद्र सरकारने देशभरातील वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाचा डाव रचला आहे. त्यासाठीचा मसुदा २० सप्टेंबरला जाहीर करण्यात आला आहे. त्यातील तरतुदी पाहून वीज क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी आतापासूनच विरोध व आंदोलनाचा सूर चालविला आहे.

ठळक मुद्देमसुदा जारी, कर्मचारी आंदोलन करणारराज्यांचा विरोध

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र सरकारने देशभरातील वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाचा डाव रचला आहे. त्यासाठीचा मसुदा २० सप्टेंबरला जाहीर करण्यात आला आहे. त्यातील तरतुदी पाहून वीज क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी आतापासूनच विरोध व आंदोलनाचा सूर चालविला आहे.केंद्र शासनातील ऊर्जा खात्याने वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्यासाठी स्टॅन्डर्ड बिडींग दस्तावेजाचा मसुदा तयार केला. त्यावर चर्चा करण्यासाठी २० सप्टेंबरला तो मसुदा जाहीर केला. वीज कायद्यात सुधारणा करण्यासाठी त्याचा मसुदा तयार करून जनतेची मते मागविली होती. परंतु हा मसुदा असलेले बिल या सत्रात लोकसभेत सादर झाले नाही.

११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोधकेंद्राच्या या मसुद्याला व त्याआड सुरू असलेल्या खासगीकरणाच्या प्रयत्नाला देशातील महाराष्ट्रासह ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तीन केंद्रशासित प्रदेशांनी तीव्र विरोध चालविला आहे.

मसुद्यात अनेक बाबी अंतर्भूतकेंद्राच्या मसुद्यामध्ये अनेक बाबी अंतर्भूत करण्यात आल्या. त्यात जास्तीत जास्त शेअर्स खरेदी, तांत्रिक मूल्यांकन समितीची निर्मिती, वितरण कंपनीची शेअर होल्डींग, वीज खरेदी करा, वीज कंपनीचा खासगीकरणाकरिता लागणारा कालावधी, वीज कंपनीवर असणाऱ्या जबाबदाऱ्या, तांत्रिक आणि वाणिज्यीक गळती, कर्मचारी बदली योजना आदींचा समावेश आहे.

५१ टक्के शेअर्स तो कंपनीचा मालक२०१४ मध्ये वीज वितरण कंपनीचे वितरण आणि पुरवठा असे दोन भाग पाडायचे निश्चित केले गेले. लोकसभेत ते बिलही पारित केले. मात्र त्याला कायद्याचे स्वरूप देता आले नाही. आता संपूर्ण वीज कंपनीनेच खासगीकरण करण्याचा घाट केंद्राने घातला आहे. ज्याचे कंपनीत ५१ टक्के शेअर्स तो कंपनीचा मालक असे केंद्राचे धोरण आहे.

महाराष्ट्रात वितरण आणि पुरवठा स्वतंत्रमहाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने मात्र वितरण आणि पुरवठा असे दोन भाग पाडले. प्रत्येक वर्षी लागणारा महसूल व मिळणारा महसूल याची सांगड घालून नियामक आयोगाकडून प्रत्येक प्रस्तावास मंजुरी मिळविली.केंद्र शासनाचा खासगीकरणाचा डाव आहे. बिल मंजूर झाल्यास राज्यांच्या अधिकारांवर गदा येणार असून सामान्य नागरिकांंनाही त्याचा फटका बसणार आहे. परंतु या बिलाविरोधात देशभर कर्मचारी संघटना आंदोलन उभे करतील.- कृष्णा भोयरसरचिटणीस, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, मुंबई.ग्राहक, राज्यांच्या अधिकारांवर येणार गदाकेंद्र शासनाने शेतकरी व कामगारविरोधी बिल अलिकडेच पास करून घेतले. आता वीज क्षेत्रासाठीचे बिल मंजूर झाल्यास ग्राहक आणि राज्यांच्या अधिकारावर गदा येणार आहे.सध्या वीज कंपन्यांमार्फत शासन दारिद्र्य रेषेखालील नागरिक, आदिवासी नागरिक, शून्य ते शंभर युनिटमधील ग्राहक यांना अनुदान देते. केंद्राचा नवा कायदा मंजूर झाल्यास हे सर्वच बंद होणार आहे.ग्राहक व वितरण कंपनीतील वाद सोडविण्यासाठी राज्य वीज नियामक आयोग आहे. मात्र नव्या कायद्यात हे अधिकार गोठविले जातील. सर्व खटले सेंट्रलाईज होऊन दिल्लीत न्यायाधीकरणाला हे अधिकार दिले जातील.सध्या वीज दर राज्यस्तरावर विभागनिहाय जनसुनावणी घेऊन निश्चित केले जातात. मात्र नव्या कायद्यात वीज दर ठरविण्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जाणार आहेत.केंद्र शासनाच्या या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात महाराष्टÑासह देशभरात ऊर्जा क्षेत्रातील १५ लाख कर्मचारी आंदोलनासाठी योग्य वेळी रस्त्यावर उतरणार आहे.

टॅग्स :electricityवीज