शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कार होताच स्मशानभूमीचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

पुसद : तालुक्यातील निंबी येथे अंत्यसंस्कार पार पडताच स्मशानभूमीचा स्लॅब काेसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. निंबी येथील ...

पुसद : तालुक्यातील निंबी येथे अंत्यसंस्कार पार पडताच स्मशानभूमीचा स्लॅब काेसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

निंबी येथील रुखमाबाई साहेबराव हराळ या महिलेचे शनिवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रुखमाबाई यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत नातेवाइकांसह गावकरी सहभागी झाले होते. सर्व जण वाशीम रोडवरील स्मशानभूमीत पोहोचले. परंपरेनुसार अंत्यविधी पार पडला. अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडताच भडाग्नी दिल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांनी अचानक स्मशानभूमीच्या शेडचा स्लॅब कोसळला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

निंबी ग्रामपंचायत हद्दीत शेडच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यामुळे स्लॅब कोसळल्याची चर्चा गावकरी करीत होते. मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बॉक्स

हे शेड सन २०१२-१३ मध्ये जनसुविधा ‌योजनेंतर्गत बांधण्यात आले असून, त्याला बऱ्याच वर्षांपासून तडे गेले होते. त्यामुळे नागरिकांनी या शेडवर दहनविधी करू नये, असे नागरिकांना सांगितले होते, अशी माहिती सरपंच मयूर राठोड यांनी दिली. या शेडभोवती बांबूचे कठाडेसुद्धा लावले होते. परंतु काहींनी ते चोरून नेले. या शेडच्या बाजूलाच टिनाच्या शेडमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.