शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या विचारांचा उत्सव साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:22 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त पेन उचलला आणि भारताचा इतिहास बदलला. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला चिकित्सेसोबतच विज्ञानवादी धर्म शिकविला.

ठळक मुद्देविवेक मोरे : पुसदच्या धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील तृतीय पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त पेन उचलला आणि भारताचा इतिहास बदलला. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला चिकित्सेसोबतच विज्ञानवादी धर्म शिकविला. त्यांना व्यक्तीपूजा अथवा व्यक्तीस्तोम मान्य नव्हते. अनुयायांनी बाबासाहेबांच्या जयंतीचे अवडंबर न करता त्यांच्या समाजोधारक विचारांचा उत्सव साजरा करावा, असे आवाह मुंबई येथील उठाव साहित्य मंचचे अध्यक्ष विवेक मोरे यांनी येथे केले.स्थानिक महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ‘आंबेडकरी चळवळीची दशा व दिशा’ या विषयावर ते तृतीय पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे होते. यावेळी राजेश आसेगावकर, प्रदीप ढबाले, ए.सी. कांबळे, संजय कांबळे, प्रमोद सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदर्शनगर येथील धम्मचक्र महिला मंडळाच्यावतीने बुद्धवंदना सादर करण्यात आली.विवेक मोरे म्हणाले, ‘फुल्यांनी काढल्या शाळा, बाबासाहेब काढलं कॉलेज, आमचं मात्र आज, सगळं वाया गेलं नॉलेज’ सद्यस्थितीत बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या विचारांशी फारकत घेऊन आचरण करीत आहे. बाबासाहेबांच्या जयंती दिनी डिजेच्या तालावर तरुणाई थिरकते हे सर्व बंद झाले पाहिजे. १४ एप्रिल हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांनी आयएफएस कसा झालो याचा सविस्तर प्रवास कथन केला. मनुष्य पैशाने नव्हे तर विचाराने गरीब असल्याचे प्रतिपादन केले. सुरुवातीला ‘भीम जयंती साजरी करू’ या समूहनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेश खडसे यांच्यातर्फे पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. संचालन नरेंद्र पाटील यांनी, आभार दीपक मेश्राम यांनी मानले. यावेळी प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष सुरज वरठी, प्रा. विलास भवरे, प्रा. कल्याण साखरकर, गणेश वाठोरे आदी उपस्थित होते.