शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

पार्सल दरोड्याने सीसीटीव्हीची पोलखोल

By admin | Updated: November 3, 2014 23:32 IST

भरदिवसा एका कुरिअर सर्व्हिसच्या प्रतिनिधीला घातक शस्त्राचा धाक दाखवून पार्सल पळविण्यात आले. या घटनेची एकच चित्रफित दहा तज्ज्ञांकडून तपासूनही बोलेरो वाहनाचा क्रमांक मात्र अद्यापही दिसलेला नाही.

यवतमाळ : भरदिवसा एका कुरिअर सर्व्हिसच्या प्रतिनिधीला घातक शस्त्राचा धाक दाखवून पार्सल पळविण्यात आले. या घटनेची एकच चित्रफित दहा तज्ज्ञांकडून तपासूनही बोलेरो वाहनाचा क्रमांक मात्र अद्यापही दिसलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी लाखो रुपये खर्च करून शहरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. गौरव भिमजीयानी रा. धामणगाव रेल्वे असे कुरिअर लंपास झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. धामणगाव येथून एसटी बसने तीन ते चार कुरिअर आणि पार्सल घेऊन त्याची खेप पोहोचविण्यासाठी तो यवतमाळात आला होता. बोलेरो वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने स्टेट बँक चौकात एक पार्सल लंपास केले. ही घटना स्टेट बँक चौकात पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या शिवाय एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ती टिपल्या गेली आहे. पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रफित ही अस्पष्ट आहे. या उलट संबंधित घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रफित स्पष्ट आली आहे. मात्र त्यामध्ये बोलेरो वाहनाचा क्रमांक दिसून येत नाही. धामणगाव रेल्वे येथून ही बोलेरो निघाली होती. घटनेच्या दिवशी एका पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे वाहन टिपल्या गेले आहे. या दोन्ही चित्रफिती शहरातील अनेक खासगी संगणक तज्ज्ञांकडे नेण्यात आल्या. मात्र अद्यापही क्रमांकाची उकल झालेली नाही. गुन्हेगारी रोखण्याचा बागुलबुवा करीत दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून यवतमाळ शहरात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. योग्य क्षमतेचे कॅमेरे खरेदी न करता थातूरमातूर आणि दर्जाहीन कॅमेऱ्यांची खरेदी झाली. त्यामुळे हे कॅमेरे निव्वळ शोभेची वस्तू ठरत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)