शहरं
Join us  
Trending Stories
1
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
2
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
3
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
4
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
5
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
6
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
7
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
8
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
9
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
10
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
11
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
12
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
13
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
14
मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती
15
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
16
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
17
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

'तीन तलाक' प्रकरणी पोलिसावरच गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 1:20 PM

Triple talaq : मुस्लीम महिला विवाह अधिनियमनाअंतर्गत एक पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पत्नीला कबूल केलेली रक्कम तर दिलीच नाही, उलट तीनवेळा तलाक म्हणून निघून गेल्याची तक्रार पीडित पत्नीने वणी पोलिसांत केली आहे. 

ठळक मुद्देमुस्लीम महिला विवाह अधिनियमनानुसार कारवाई

यवतमाळ : कबूल केलेली रक्कम तर दिलीच नाही, उलट पत्नीपुढे तीनवेळा तलाक (Triple talaq) म्हणून निघून जाण्याचा आरोप असलेल्या वणी पोलीस ठाण्यातील नायक पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इम्रान दिवाण खान असे गुन्हा दाखल झालेल्या शिपायाचे नाव असून तो स्थानिक रवीनगरमधील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार इम्रान खान याचे घरगुती कारणावरून पत्नीशी नेहमीच खटके उडत होते. दरम्यान, इम्रान खानने पत्नीला सात लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यापैकी सुरुवातीला केवळ अडीच लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम जून महिन्यात देतो, असे त्याने सांगितले होते.

परंतु जून महिना लोटूनही इम्रान खानने पत्नीला पैसे दिले नाही. त्यामुळे तिने इम्रान खानला आपण सोबत राहू, असा प्रस्ताव ठेवला. मात्र त्याने मला तुझ्या सोबत राहायचेच नाही म्हणत हा प्रस्ताव धुडकावून लावला. सोबतच तिच्यापुढे तीनवेळा तलाक म्हणून तो तेथून रागारागात निघून गेला.

यासंदर्भात पीडित पत्नीने वणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर शुक्रवारी याप्रकरणी वणी पोलिसांनी इम्रान दिवाण खानविरुद्ध भादंवि ४९८ अ, सहकलम ४ मुस्लीम महिला विवाह अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकCrime Newsगुन्हेगारी